कोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराला नकार
- श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथे पोलीस,आरोग्य विभाग व पत्रकारांनी लावला खांदा
- सा. पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी घडवले माणुसकीचे दर्शन
कुणाल माळवदे -श्रीवर्धन
वांजळे हनुमान वाडी येथील बाबु सोनु काते वय ८७ वर्षे हे शुक्रवार दिनांक २० जुन रोजी रात्री ८:३० ला अचानक मयत झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल देखील कोरोना पोजिटिव्ह आला होता. मात्र ते काळ रात्री अचानक मयत झाले असता त्यांच्या अंत्य विधीला नातेवाईक ग्रामस्थांनी नकारत्मक भूमिका दर्शवल्या नंतर काही ग्रामस्थांनी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सा. पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या कडे दूरध्वनीवरून सर्व बाब लक्षात आणून दिल्या नंतर तात्काळ सा पोलीस निरीक्षक संदीप पोमन,पोलीस नाईक संदीप चव्हाण,सावंत, होमगार्ड डॉ सुरज तडवी ,पत्रकार अमोल चांदोरकर ,सर्फराज दर्जी यांनी घटना स्थळी भेट देत अंत्यविधी करण्याची तयारी दर्शवली असता त्या ठिकाणी त्यांना ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेत मदत केली असल्याची सा निरीक्षक संदीप पोमन यांनी सांगितले
मृताला खांदा देऊन पोलीस प्रशासन, आरोग्य प्रसाशन व पत्रकारांनी समाजाला माणुसकीचे दर्शनच घडवून दिले आहे. मात्र असे प्रकार वारंवार घडू नये म्हणून प्रशासनाने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून जनजागृती करण्याची गरज आहे.