Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी उत्तम पथदर्शी काम करा ' - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

 जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी उत्तम पथदर्शी काम करा ' - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई 

प्रतीक मिसाळ -सातारा



जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ . निलम गो - हे यांनी केल्या होत्या . त्या अनुषंगाने पोलीस विभागाने विविध विभागांचा सहभाग घेऊन चांगले रोल मॉडेल तयार करावे , अशा सूचना गृह ( ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या . महिला दक्षता समित्यांचे पुर्नरचना , महिला अत्याचार रोखने , बालकांबाबतचे अत्याचार रोखणे याबाबत पोलीस विभागाच्यावतीने पथदर्शी प्रकल्प सातारा जिलह्यात राबविण्याबत येणार आहे . त्याचा आढावा आज गृह राज्यमंत्री श्री . देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला . 



या बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल , अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल , अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे , जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी मनोज ससे आदीउपस्थित होते . महिलांवरील व मुलींवरी अत्याचार रोखण्याबाब पथदर्शी प्रकल्प जिलह्यात राबविण्यात येणार आहे . पथदर्शी प्रकल्प विविध विभागांचा समावेश घेऊन चांगल्या पद्धतीने तयार करा . अधिवेशन संपात ह्या प्रकल्पाचे रॉल मॉडेल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो - हे यांना दाखविण्यात येईल . हा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे दोन ते तीन महिन्यात परिणाम दिसतील . यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करा , अशा सूचनाही गृह राज्यमंत्री श्री . देसाई यांनी बैठकीत केल्या .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies