- सातारा हायवे सर्विस रोड लगत तीन वाहनांच्या अपघातात 1जण ठार
- मालवाहू ट्रकचे अचानक टायर फुटल्याने झाला अपघात
अमोल धोत्रे -सातारा
सातारा शहरातील आज शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टारंट चौकातील सेवा रस्त्यावर वाहनांचा तिहेरी भीषण अपघात झाला आहे . कोबी घेऊन जाणारा ट्रक , चारचाकी व एका दुचाकींचा मोठा अपघात झाला आहे . या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत .
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी , सातारा शहरातील पुणे- बंगळूर महामार्गाजवळील सेवा रस्त्यांवर हा अपघात झाला आहे . कोल्हापूरवरून पुण्याकडे कोबी घेवून जाणाऱ्या ट्रक क्रमांक ( केए- 02- ए एम- 2215 ) , चारचाकी क्रमांक ( एमएच- 11 पीजी- 2915 ) आणि दुचाकी क्रमांक ( एमएच- 11 -बीएक्स- 9459 ) या वाहनांचा तिहेरी अपघात झाला . या अपघातानंतर चारचाकी शेजारील उभा असलेल्या पत्र्यावर गेली . चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे .घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले असून ठप्प असलेली वाहतूक सुरळीत केलेली आहे . या अपघातात दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे . अपघात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती .
कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या ट्रकमध्ये कोबी होती. या ट्रकचालकांचा ताबा सुटल्याने महामार्गावरील बॅरिगेट तोडून ट्रक सेवा रस्त्यांवर आला . यावेळी या ट्रकने एका चारचाकी व दुचाकीला जोरदार धडक दिली आहे . यामध्ये दुचाकी व चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे . तर एक पिकअप अपघातातून थोडक्यात बचावली असल्याची माहीती घटनास्थळांवरील पोलिसांनी दिली .