महात्मा फुले मंडई येथे 10 रुपयात शहरात बस प्रवास या अंतर्गत 50 मिडी बसेसचे लोकार्पण.
गजानन गायकवाड-पुणे
पुणे महानगरपालिकेच्या वतीने फक्त 10 रुपयात दिवसभर AC बस प्रवास योजना शुभारंभ या अंतर्गत 50 मिडी बसेसचा लोकार्पण सोहळा राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.
सर्वसामान्य नागरिकांना अल्प दरात AC बस प्रवास करायला मिळावा या भूमिकेतून पुणे महानगरपालिकेने व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या माध्यमातून अत्यंत चांगली, लोकोपयोगी योजना आणली आहे.
२०१७ साली पुणे महानगरपालिकेवर भाजपा ची सत्ता आल्या पासून अशा अनेक लोकोपयोगी योजना पुणेकरांसाठी मनपाने राबविल्या आहेत. या पुढेही सर्वसामान्य पुणेकर नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून मनपा कार्यरत राहील असा विश्वास भाजपा नेत्यांनी दाखवला.
यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील व शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ,सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, योगेश टिळेकर,धिरज घाटे,उपमहापौर सुनिता वाडेकर,सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,शहर सरचिटणीस, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.