श्री.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजारो श्री सदस्यांनी हाती घेतली स्वच्छता मोहीम
नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने अत्यंत महत्वाची स्वच्छता मोहीम सदस्य राबवत आहेत स्व:खर्चांने
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूण तालुक्यात दि. २२ जुलै रोजी अचानक आलेल्या महापुरात शहर आणि अनेक गावातील नागरिकांचे मोठे हाल झाले, व्यापारी बांधवांचे झालेले अतोनात नुकसान आणि ग्रामीण भाग ,नदीलगतच्या गावांमधील शेकडो घरे उद्वस्थ झाली होती या प्रलयंकारी संकटात चिपळूण बाजारपेठेत सर्वत्र घाणीचे,
कचऱ्याचे साम्राज्य ,दुर्गंधी पसरली होती. या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाणारी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. अशावेळी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या आज्ञेने श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा. जि. रायगड यांच्या वतीने कोकणास पश्चिम महाराष्ट्र येथून सातारा,सांगली,कोल्हापूर, अलिबाग,पेण,रोहा,चौल रेवदंडा,महाड,माणगाव,श्रीवर्धन,कर्जत,पोलादपूर,खेड, रत्नागिरी,लांजा,देवरुख,राजापूर येथील श्री सदस्यांनी चिपळूण वासियांकरिता स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होऊन महत्वपूर्ण योगदान दिले आहे.मंगळवारी आणि बुधवारी सकाळी ७ वा सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेची सुरवात शहरातील बहादूरशेख नाका,चिंचनाका आणि चिपळूण नगरपालिका येथून झाली. सर्वच श्री सदस्य चिपळूणमधील जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग तसेच पसरलेली दुर्गंधीयुक्त धान्य,सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेली दलदल साफ करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले दिसून आले.यावेळी श्री सदस्यांनी शेकडो टन कचरा उचलल्याने शहरातील व्यापारी वर्ग आणि नागरिक यांना मदतीचा मोठा हात मिळाला तर सर्वांनी समाधान व्यक्त केले.
मागील काही दिवस प्रशासनाने कचरा उचलण्याचे काम हाती घेऊनही बाजारात ठीक ठिकाणी
कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत होते.यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन एक हजारहून अधिक श्री सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.सोबतच रोगप्रतिबंधक फवारणी केली
स्वतःच्या जेवणासह स्वखर्चाने सर्व सदस्य मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.सहा डंपर दोन जेसीबी मशीन घेऊन कचरा ,चिखल,साफ करण्याचे काम सर्वत्र सुरू होते.जुनास्टँड,भेंडीनाका
नाथपैचौक,मेनरोड, गांधीचौक,खाटीक आळी, भाजी मंडई, काविळतळी,वडार कॉलनी,बाळकृष्ण नगर, गोवळकोट, बुरुमतळी , बाजारपेठ, बहादूरशेख नाका ,खेर्डी, बाजारपेठ ते पेठमाप,शंकरवाडी , मुरादपुर तसेच शहरातील आणि उपनगरातील सर्व ठिकाणचा कचरा उचलून असंख्य डंपर मधून शिवाजी नगर कचरा प्रकल्प येथे टाकण्यास पाठविला जात होता.
चिपळूण मध्ये मंगळवारी राबविण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या मोहिमे बाबत चिपळूण शहरातील व्यापारी,आणि नागरिकांनी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी धर्माधिकारी यांच्या शिकवणी बद्दल आदर व्यक्त करून समाधान व्यक्त करीत श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री सदस्यांचे आभार मानले आहेत.या पूर्वीही २०१९ मध्ये सांगली,
कोल्हापूर,कोकण विभाग येथे आलेल्या महापुरात श्री सदस्यांनी मोठे स्वच्छतेचे सेवाकार्य केले होते,शिवाय केरळ येथे आलेल्या महाप्रलंयकारी पुराच्या संकटात यथोचित आर्थिक सहकार्यही करण्यात आले होते.