कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, काही गावात पाणी शिरायला सुरुवात
भिमराव कांबळे -कोल्हापुर
कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. आंबेवाडी, चिखली गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. शहरातील सुतार माळ परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे. चिखली गावातील लोकांना स्थलांतरित केले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहरातही पाणी यायला सुरुवात झाली आहे. पुणे-बंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यमगर्णी जवळ महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक अडवली आहे. राधानगरी तालुक्यातील कोनोली येथे घर कोसळून दोन जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. धामणी नदीच्या पुरात एक म्हैस, एक बैल गेला वाहून गेला आहे. पन्हाळा मार्गावर अडकलेल्या कर्नाटकच्या बसमध्ये अडकलेल्या 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.