Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ज्या मातीत घडलो त्या मातीसाठी मला योगदान द्यायचे आहे. : संजय महाडिक


ज्या मातीत घडलो त्या मातीसाठी मला योगदान द्यायचे आहे. : संजय महाडिक

             गुरुनाथ साठेलकर-खोपोली

मला कुस्ती या खेळाने आयुष्यातल्या सर्व पातळीवर यश संपादन करण्याची संधी दिली असं प्रतिपादन करताना माझ्या नावाचे अध्याक्षर 'स' या अक्षरापासून सुरू होतं,  मात्र  'स' पासून सुरू होणाऱ्या सज्जन किंवा सदगुण या बाबींचा दुरान्वये संबंध कधी युवास्थेत आला नाही अशी संजय महाडिक यांनी कबुली दिली, वेळ घालविण्यासाठी  काहीतरी करायचं म्हणून कुस्ती खेळायला लागलो आणि योगायोगाने जीवनातील प्रत्येक डाव जिंकत गेल्याचे गुपित आपल्या सत्कार सोहळ्यात सांगितले. ज्या कुस्ती खेळाने मला एवढी मोठी संधी दिली, त्या कुस्तीसाठी अणि क्रीडा क्षेत्रासाठी माझे पद आणि प्रतिष्ठा कामी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.


खालापूर तालुका किडा संकुलाच्या निर्मितीचा अर्धवट राहिलेला विषय मार्गी लावण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असा संकल्प व्यक्त करताना, गुरुवर्य कुस्ती महर्षी स्व. भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंती दिनाच्या औचित्याने आपला झालेला सत्कार आणि गौरव हा दुग्धशर्करा योग असल्याचे महाडिक म्हणाले. आपल्या युवा अवस्थेतील मित्रांच्या सहवासात झालेला हा सोहळा आपल्याला नवी ऊर्जा देणारा ठरला असे भावोद्गार त्यानी काढले.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयाच्या मुंबई विभाग उपसंचालक पदी संजय महाडिक यांची नियुक्ती झाल्याने यशवंती हायकर्स खोपोली या संस्थेचा विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमनताई औसरमल, उपाध्यक्षा विनिता कांबळे, यशवंती हायकर्स चे अध्यक्ष महेंद्र भंडारे, उपाध्यक्ष मच्छिंद्र यादव, सचिव संदीप पाटील यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा पार पडला. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष किशोर पाटील, सदस्य दिनेश गुरव यांनी देखील महाडिक यांचा सत्कार केला.

खालापूर तालुका कुस्तीगीर संघटना, खोपोली क्रिकेट असोसिएशन, नगरसेवक मोहन औसरमल,  राजू गायकवाड किशोर पानसरे, माजी नगरसेवक सचिन मसुरकर, सुभाष घासे, राजन साखरे, नगरसेविका सुर्वे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे गुरूनाथ साठेलकर, पत्रकार,  के टी एस पी चे माजी विद्यार्थी, क्रीडा शिक्षक आणि शहरातील अनेक मान्यवरांनी महाडिक यांचा गौरव केला. कै.र. वा. दिघे संकुलात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्ममाकर गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सगळगिळे सरांनी केले, सूत्र संचलनाची जबाबदारी संदीप पाटील यांनी पार पाडली. हा सत्कार सोहळा संपन्न करण्यासाठी यशवंती हायकर्सच्या सर्व सभासदांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies