नसरापूर गावातील वीजपुरवठा सहा दिवसांनी पूर्ववत
वीजवितरण कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थांनी केले अथक परिश्रम
नरेश कोळंबे-कर्जत
ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर मधील मौजे नसरापूर गावातील वीजपुरवठा महापुरामुळे ६ दिवसापासून खंडित झाला होता. विजेचे ६ पडलेले खांब जिद्दीने तात्काळ उभारत महावितरणने तो वीज पुरवठा आज पूर्ववत केला, त्यामुळे वेगाने केलेल्या कामाबाबत सर्व कर्मचारी वर्गाचे सर्वच भागातून कौतुक होत आहे.
ब्रिटिश काळात तालुक्याचे ठिकाण असलेले नसरापूर गाव महापुरामुळे ६ दिवसांपासून अंधारात होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक शिवमंदिराजवळ ६ विजखांब महापुरामुळे पडले होते. दोन विजखांब तर नदीकाठी असल्यामुले महापुरात वाहून गेले आणि त्यामुळे गावातील सर्वांची विजेअभावी मोठी गैरसोय निर्माण झाली होती. महावितरण कडाव सेक्शनचे सहाय्यक अभियंता रितेश साबदे त्याच बरोबर वरिष्ठ तंत्रज्ञ अशोक कारले यांच्या विशेष सहकार्याने सदरचे काम करण्यात आले.
यावेळी युवासेना कर्जत तालुका सचिव अॅड.संपत हडप, गोविंद भोईर हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. नसरापूर गावातील प्रभाकर मोहिते, दयानंद मोहिते, नितीन बोराडे, नरहरी थोरवे, रज्जाक शेख, अनिल साळुंखे, कैलास मोहिते, अर्जुन मोहिते, सुरेश देवघरे, कृष्णा मोहिते, दीपक मोहिते, नाना मोहिते, हरीचंद्र मोहिते, रवींद्र मोहिते, चिंचवली येथील अतुल हडप, सचिन हडप, सौरभ राऊत, प्रसाद कर्णूक, रोहन मोहिते, प्रल्हाद मोहिते, सुशांत मोहिते, हे गावातील ग्रामस्थ दोन दिवसांपासून सदरच्या कामासाठी धावपळ करत होते. वरिष्ठ तंत्रज्ञ अशोक कारले यांनी जिद्दीने काम करत २५ तारखे अखेर नसरापूर येथे ६ दिवसाने लाईट आणली. ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कर्मचारी वर्गाचे जाहीर आभार मानण्यात आले.