नोकियाचा वॉटरप्रुफ 5G फोन लॉंच, पडला तरी होणार नाही काहीच
ज्ञान तंत्रज्ञान
अनुप ढम
Nokia XR20ची किंमती काय असेल?Nokia XR20 या फोनची किंमत 550 डॉलर (अंदाजे 40,910 रुपये) असणार आहे. तसेच हा जबरदस्त फोन तुम्हावा अल्ट्रा ब्लू किंवा ग्रॅनाइट ग्रे रंगाच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. 24 ऑगस्टपासून या फोनची विक्री सुरू होईल. सध्या भारतात हँडसेट लॉन्च करण्याबाबत माहिती मिळाली नाही.काय आहेत खास गोष्टी?Nokia XR20 मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी + आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट देण्यात आली आहे. रॅम 6 GB आहे तर इनबिल्ट स्टोरेज 128 GB आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते.कंपनी Nokia XR20 ला 'लाइफ-प्रूफ' स्मार्टफोन असल्याचा दावा करत आहे. हँडसेटला रग्ड कव्हर आहे जे MIL-STD810H सर्टिफाइड आहे म्हणजे हा फोन आपण 1.8 मीटर उंचीवरुन खाली टाकला तरी याला कोणतेही नुकसान होणार नाही. डिव्हाइस IP68 रेटिंगसह पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे.
नवीन नोकिया फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल चे फिक्स्ड-फोकस लेन्स आहेत. हँडसेटमध्ये 4630mAh बॅटरी देण्यात आली असून, त्याद्वारे कंपनीने दोन दिवसांची बॅटरी लाईफ मिळेल असा दावा केला आहे. बॅटरी 18W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.नोकिया एक्सआर 20 मध्ये स्टीरिओ स्पीकर्स उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये OZO प्लेबॅक टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. हँडसेटच्या कडेला फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. नोकिया एक्सआर20 मध्ये एक कस्टम बटण देखील आहे जे आपण कोणत्याही कामासाठी किंवा अॅपसाठी सेट करू शकता.