साईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित
अमूलकुमार जैन-अलिबाग
साईनाथ पवार हे रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या दिव्यांग विभागात कार्यरत आहेत.ते स्वतः दिव्यांग असल्यामुळे त्यांना दिव्यागांच्या त्यांच्या दैनंदिन कार्यात भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव आहे.आपला दिव्यांग हा कोणापुढे हात न पसरता त्याने स्वावलंबी व्हावे त्यानेस्वतःचा छोटासा व्यवसाय करावा यासाठी त्याची तळमळ असल्याने त्यांनी शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली असून काहींना रोजगार ही प्राप्त करून दिला आहे.
गेले 17वर्ष दिव्यांग कर्मचारी / दिव्यांग व्यक्तींचा हीतार्थ निस्वार्थी वृत्तीने दिव्यांग कर्मचाऱ्या बरोबरच इतर दिव्यांग बांधवांसाठी मोलाचे कार्य केले आहे लसीकरणाबाबत दिव्यांग बांधवांना लस देण्यासाठी इतर सामाजिक संस्थांचा आधार घेऊन विशेष दिव्यांग लसीकरण मोहीम राबवली, लाॅकडाऊन कालावधीमध्ये दिव्यांग व इतर दुर्बल घटक यांना अन्नधान्य व इतर मदत स्वतः 100 टक्के दिव्यांग असून मदतीला धावत होते.पवार करीत असलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विशेष दखल घेऊन त्यांना राजभवन येथे आमंत्रित करीत साईनाथ पवार यांना विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
साईनाथ पवार यांना महामहिम राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांनी सन्मानित केले .त्याबाबत त्यांचे महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाजाचे अध्यक्ष राजू साळुंके,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष अमूलकुमार भलगट, आई फाउंडेशनचे सागर पवार,जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील,अखिल भारतीय कांठा प्रांत ओसवाल साजना संघाचे माजी सदस्य केवळचंद जैन, मुरूड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमूलकुमार जैन यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.