वारणा,कोयना धरणातून कमी केलेला विसर्ग आणि मंदावलेला पाऊस या पार्श्वभूमीवर कृष्णेची पूरपातळी दोन इंच माघार घेत उताराला लागलीय.दरम्यान सांगलीत व कृष्णाकाठी महापूराचे नागरी वस्तीत घुसलेले पाणी व नुकसान यामुळे जनजीवन उध्वस्त व विस्कळीत झाले आहे. पालकमंत्री जयंत पाटील ,राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेटी पाहणी दौरे करत लोकांना धीर देत तर यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौरा करणार आहेत. स्थानिक बोट क्लब,व एन डी आर एफ पथक पुरात अडकल्या नागरीकांना बाहेर काढत आहेत सुमारे दिड लाखाहून आधिक लोक घर सोडून स्थलांतरित झाले आहेत. भाजपने पूरग्रस्तांना व शेतकऱ्यांना तातडीने रोख मदत द्या अशी मागणी केली आहे.