तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत 53 जणांचे मृतदेह हाती लागले असून मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडू लागले. मृतदेहाची अवहेलना होऊ लागल्याने त्यामुळे बचाव कार्य थांबवा या ग्रामस्थांच्या मागणीनंतर आज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उर्वरित बेपत्ता ग्रामस्थांना मृत घोषित केले. त्यामुळे मृतांची संख्या 84 झाली आहे. मृतदेहाची अवहेलना पाहवत नव्हती, त्यामुळे या पुढे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने हा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला.