माथेरान मिनिट्रेन शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ
चंद्रकांत सुतार-माथेरान
माथेरान पर्यटनावर आधारित असलेल्या स्थानिकांची जीवनवाहिनी म्हणजे मिनिट्रेन पावसाळ्यात चार महिने नेरळ ते माथेरान दरम्यान ही सेवा बंद करण्यात येते. परंतु काही वर्षांपासून इथे अमन लॉज ते माथेरान स्टेशन या तीन किलोमीटरच्या अंतरासाठी शटल सेवा उपलब्ध असते. मागील वर्षी आणि नुकताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे ही शटल सेवा पर्यटकांअभावी बंद होती नाममात्र एक फेरी उपलब्ध होती.त्यामुळे लॉक डाऊन नंतर ह्या शटल सेवेतील फेऱ्यात वाढ होणे गरजेचे होते याठिकाणी सर्वसामान्य नागरिक त्याचप्रमाणे लहान मोठे हॉटेल व्यावसायिक यांचे जीवनमान येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते आणि पर्यटकांना अमन लॉज येथून गावात येण्यासाठी स्वस्त दरात केवळ शटल सेवा हाच एकमेव पर्याय उपलब्ध असतो.या साठी नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी १० जून रोजी मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांच्याशी पत्रव्यवहार करून शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ करण्याबाबत निवेदन दिले केले होते,त्यानंतर खासदार बारणे यांनी दि.१४ जून रोजी
रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांच्याशी पत्रव्यवहार तसेचफोनद्वारे संभाषण करून माथेरान करांचीही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे सूचित केले होते, शटलफेऱ्या वाढी व साठी सामाजिक कार्यकर्ते जनार्धन पार्टे यांनीही ३/७/२०२१ रोजी मध्य रेल्वेचे drm यांना पत्र व्यवहार केला होता,त्यानुसार सोमवार ते शुक्रवार चार चार फेऱ्या आणि शनिवार रविवारी सहा सहा फेऱ्या करण्यात येणार आहेत.आणि जसजसे पर्यटन वाढेल त्याप्रमाणे ह्या फेऱ्यात आणखीन वाढ करण्यात येईल वेळा पत्रक मध्ये काही बदल करायच्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
असे गोयल यांनी बारणे यांना सांगितले आहे. त्यामुळे आता इथे शटल सेवेच्या माध्यमातून पर्यटकांची संख्या वाढणार असून सर्वानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.