तांदूळ गारा,कणीयुक्त देऊनी गरिबांची थट्टा
माथेरानकर संतप्त
चंद्रकांत सुतार--माथेरान
सर्वसामान्य लोकांनसाठी मिळणारे रेशन वरील तांदूळ, गहु हे साध्य तरी खुप मोलाचे आहेत मागील दोन वर्षे कोरोना कोरोना लॉक डाऊन मुळे सर्वसामान्यांचे जीवनमान पुरते विस्कटून गेले, नोकऱ्या गेल्या व्यवसाय बंद, साठवलेली शिदोरी लॉक डाऊन काळात संपली त्यातच हाताच्या बोटावर कमऊन खाणाऱ्याचे तर खुपच हाल , सरासरी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत फक्त रेशनकार्ड वरील रेशन घेत नसतील, बाकी सर्वच लोक रेशन वरील धान्य मिळण्यासाठी रांगा लावत असतात, कमी दरात त्यातल्या त्यात खाण्या योग्य असलेले तांदूळ गहु प्रामुख्याने लोक घेत असतात बाकी तसे रेशनवर काही मिळतच नाही, सध्या लॉक डाऊन , महागाई, व्यवसायचा बेभरवसा अश्यातच आधार आहे तो रेशन वरील धान्याचा, लॉक डाऊन काळात हेच रेशन तांदूळ गहु काही महीने मोफत ही दिले आहे देत आहे, परंतु मागील दोन दिवसा पासून माथेरान मध्ये महिन्याचे रेशन देणे सुरू आहे, त्यात सध्या आलेला तांदूळ हा तांदूळ नसून त्याची कनी होऊन तो तांदुळ आलेला आहे, एक किलो मध्ये पन्नास ग्राम देखील तांदूळ मिळत नाही एव्हडे कणी झालेले तांदूळ येथे तीनही रेशन दुकाना मध्ये भरणा झालेला आहे , आणि गेले दोन तीन दिवस तो रेशन कार्ड धारकांना विकत वाटप ही करण्यात आला, तांदुळ बघताच अनेक संतप्त महिलांनी रेशन दुकानदाराना जाब विचाराताना वादविवाद होताना दिसत आहे, बाहेरील दुकानातील धान्य खुप महाग असल्याने रेशनवर मिळणाऱ्या तांदूळ गहु मुळे अनेकांच्या चुली पेटतात दोन घास पोटात जातात, त्याच मुळे रेशनवर मिळणाऱ्या धान्य साठी सर्वसामान्य बरोबर काही धनाढ्य लोक ही हे घेण्यासाठी रांगेत उभे असतात, त्यामुळे अश्या प्रकारचे कणीयुक्त तांदूळ वाटप करून एक प्रकारचे गरीबाची थट्टा आज मांडली कणी युक्त तांदूळ देऊन असे बोलले तर वावगे ठरणार नाही,कर्जत तालुक्यात धान्यचे तीन धान्य गोडाऊन आहे.एक कर्जत दुसरे नेरळ तिसरे कशेळे या तीनही गोडाऊन ला कर्जत तालुका पुरवठा महसूल विभागाकडून वेळेच्या वेळी विभागवार धान्य दिले जाते.नंतर त्या गोडाऊन मधून आजूबाजूच्या रेशन दुकानासाठी गावोगावी पाठविले जाते.हा धान्य भरणा ग्राहकांना पाठवताना योग्य प्रकारे आहे की नाही व घेताना येथील दुकानदार,अधिकारी वर्ग ही बाब तपासतात की नाही या बाबत आता शंखा निर्माण झाली आहे, पाठवला भरणा द्या दुकानात, रेशनचेच आहेत ते असेच असणार ही मासिकात गरीब जनतेने केली आहेच त्यामुळे आयुष्यात कधीही असे धान्य मिळाले नाही की निवडल्या पाखडल्या शिवाय खाता आले, त्याच मुळे रेशन वरील धान्य भरणा वाटप या बाबत कोणीही गांभीर्याने घेताना दिसत नाही , आज ज्या प्रकारचा तांदुळ वाटप करण्यात येतोय तो खाण्या लायक आहेच नाही तरीही तो वाटप होतोय महिला वर्ग घेताना बडबड करत नाईलाजास्तव घेतच आहेत याबाबतही आश्चर्य व्यक्त होतेय.तरी लोकांच्या जीवानिशी.निष्काळजी पणा दाखविणाऱ्या पुरवठा अधिकारी वर्गाला शिक्षा होणे आवश्यक आहे व आज चा दिलेला तांदूळ हा रद्द करून पुन्हा घेतलेल्याना ही परत नवीन चागल्या प्रतीचा तांदूळ द्यावा अशी संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गाने दिल्या आहेत,
आम्हाला असले खराब तांदूळ देऊन काय उपयोग सर्व कणीच आहे त्यात गारा ही आहेत ते तांदूळ आम्ही कसे खायचे आम्हाला हे तांदूळ बदलून द्यावे
जरीना मोहमद महापुळे
वृद्ध महिला गृहिणी----------------------------------------
ह्यावेळी रेशनवर जे तांदूळ मिळाले त्यात सर्रास कणी व गारा खडे असल्याने खुप खराब आहेत, 3 किलो ते तांदूळ निवडताना 2 तास गेले खूपच गारा व खडे आहेत, व कणी ज्यास्त असल्याने ते खायच्या योग्यच नाहीच ,तरी ह्या वेळचे हे तांदुळ परत चांगल्या प्रकारचे मिळावे ,
सानिका राजू जाबरे
गृहिणी