वर्षा शिंदे यांची माथेरान महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
चंद्रकांत सुतार--माथेरान
माहेर व सासरी सामाजिक व राजकीय वारसा लाभलेल्या वर्षा शिंदे यांची माथेरान महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे . माथेरान शहर काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकारिणीची बैठक आज शहर अध्यक्ष मनोज खेडकर यांच्या निवासस्थानी पार पडली मंदिरा दळवी यांनी गेली दहा वर्षे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सक्षम पणे पार पाडल्या बद्दल मनोज खेडकर यांनी आभार व्यक्त केले. नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने महिला आघाडी नव्याने तयारी करण्याच्या दृष्टीने नवीन अध्यक्ष्यांची तात्काळ निवड आवश्यक होती, माथेरान मध्ये येण्याऱ्या निवडणुकीत महिलांराजच महत्वचा ठरणार असल्याने , नवनिर्वाचित कार्यकारणी निवड होणे अपेक्षित आहे,त्यानुसार आज पक्ष्याच्या महिला कार्यकारिणीने आज एक मताने सामाजिक कार्याची आवड असलेल्या सौ वर्षा सुनील शिंदे यांची निवड केली आहे. पक्षा साठी आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या वेळी महिलांनीच पुढाकार घेत काँग्रेस पक्षासाठी पुढे येत संघटनात्मक मजबूती करणांची बीजे रोवली आहेत, मागील काळात अनेक महत्वच्या वेळी माजी अध्यक्षा सौ मंदिरा दळवी यांनी सक्षम पणे पक्षाचे नेतृत्व केले असले तरी त्याच्या मार्गदर्शन अनुभव नवनिर्वाचित माथेरान महिला काँग्रेस अध्यक्षांना लाभेल यात शंखा नाही,पालिकेत 50 टक्के महिलांना साठी आरक्षण असल्याने माथेरानच्या विकासात महिलांची भूमिका महत्वपूर्ण आहे. माथेरानच्या महिलांचे विविध प्रश्न आहेत ते सोडवण्याची प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे वर्षा शिंदे यांनी सांगितले आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा माथेरान पालिकेवर फडकणार असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते शिवाजी शिंदे यांनी वर्षा शिंदे या सामाजिक क्षेत्रात काम करीत असतात विधवा महिलांसाठी तिळगुळ समारंभ असेल लॉक डावूनचा काळात हॉटेल मधील कामकरणाऱ्या महिलांसाठी सामाजिक संस्थान मार्फत अन्नधान्याचे वाटप तसेच त्या प्राणी प्रेमी देखील आहेत
काँग्रेस अध्यक्ष मनोज खेडकर , नगरसेवक शिवाजी शिंदे, नागरी पतसंस्थेचे सभापती हेमंत पवार, अर्चना कदम, सुहासिनी दाभेकर,कल्पना पंड्या मंदाकिनी तुपे, तनिष्का रमाने , नीना पवार, शुभांगी कदम, राधा खेडकर, शुभांगी शिंदे , नेहा रांजणे आदी उपस्थित होत्या.