मयत शिक्षकाच्या कुटुंबियांस सहकाऱ्यांनी दिले आर्थिक पाठबळ
उमेश पाटील-सांगली
संतोष कांबळे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला यातून त्यांना धीर देण्यासाठी म्हणून संस्थापक, शिक्षक वर्ग, माजी विद्यार्थी, परिसरातील हितचिंतक यांच्या सहकार्यातून एक लाख सत्तर हजार रुपये मदतनिधी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. संतोष कांबळे यांच्या सहकार्याने त्यांच्या कुटुंबियांना या रूपाने आर्थिक पाठबळ दिले तसेच कुटुंबियांना धीर ही दिला.
संतोष कांबळे हे स्मिता पाटील विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक होते. विद्यालयाच्या प्रत्येक उपक्रमात ते हीरारीने भाग घेत होते. त्यांचे अचानक त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय दुःख सागरत बुडाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबा समोर अनेक प्रश्न निर्माण झाले. या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय स्मिता पाटील विद्यालयातील शिक्षकांनी घेतला. संस्थापक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी एकत्र येत एक लाख 70 हजार रुपये इतकी मदत गोळा केली. ही रक्कम संतोष कांबळे यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.
यावेळी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा संजीवनी पाटील यांनी संतोष कांबळे यांच्या विद्यालयातील उत्कृष्ट व उपक्रमशील कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील पुरस्काराने सन्मानित करण्याचा संस्था ठराव वाचून दाखविला.
यावेळी संस्थापक प्रा.एस आर पाटील यांनी संतोष कांबळे यांच्या निधनाने शाळेची खूप मोठी कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे सांगितले. तसेच संस्थेने संतोष कांबळे यांच्या रुपाने कर्तुत्ववान, उपक्रमशील शिक्षक गमावला असल्याचेही यावेळी नमूद केले.
तसेच माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी शाळेच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विविध नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमध्ये व उपक्रमात संतोष कांबळे यांचे योगदान मोलाचे होते,असे सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नीलम डोळसकर, सामाजिक कार्यकर्ते विजय खिलारे, हमीदभाई शेख, संजय हिंगे, सेवानिवृत्त अभियंता प्रदीप शेटे ,चव्हाण, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक तनपुरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक किरण पाटील व शिक्षक वर्ग व संतोष कांबळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.