अँड. शुभांगी शेरेकर यांची काँग्रेस सहकार सेलच्या अध्यक्षपदी निवड
ओंकार रेळेकर-चिपळूण
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे. अँड.शुभांगी शेरेकर या कायद्याच्या पदवीधर असून सहकार विषयातील त्यांचा चांगला अभ्यास आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी सहकाराशी संबंधित न्यायालयीन खटल्यात बाजू मांडली आहे. महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माणांशी संबंधित नियम व कायदे बनविणा-या कमिटीतही त्यांनी योगदान दिले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा काँगेस पक्षाला फायदा होईल अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र देताना शुभेच्छा दिल्या