Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

प्रतापगड कारखाना सुरू न झाल्यास टाळे तोडू : आ.शशिकांत शिंदे यांचा गंभीर इशारा

 प्रतापगड कारखाना सुरू न झाल्यास टाळे तोडू : आ.शशिकांत शिंदे यांचा गंभीर इशारा

प्रतीक मिसाळ-सातारा

जावळीच्या हक्काचा प्रतापगड साखर कारखाना दुर्देवाने बंद पडला म्हणून तो किसनवीर कारखान्यास चालवण्यास दिला , १६ वर्षांच्या कराराने चालवण्यास दिलेला कारखाना गेल्या तीन हंगामा पासून बंद ठेवण्यात आला आहे . कोणत्याही परिस्थितीत प्रतापगड कारखाना सुरू झाला पाहिजे . जर चालवायचा नसेल तर माझी तयारी आहे . सर्व जावंलीकर उस उत्पादकांना घेऊन या कारखान्याचे टाळे तोडू असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला . दरम्यान कारखान्याचे संचालक सौरभ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून जावलीचा कारखाना पूर्वीच्या संचालक मंडळाच्या ताब्यात द्यावा, असेही त्यांनी नमूद केले  

कुडाळ ( ता . जावळी ) येथे जरंडेश्वर कारखाना बचावासाठी जावळी तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते . भविष्यात महू , हातगेघर बंडारवाडी धरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास मोठ्या प्रमाणावर जावळीत उस वाढणार आहे . सध्या दिड लाख मेट्रीक टनाचे ऊस उत्पादन जावळी तालुक्यात होते , असे नमूद करुन श्री . शिंदे म्हणाले , ' प्रतापगड कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आणि म्हणून उस उत्पादकाला इतरांच्या पुढे हात पसरण्याची वेळ आलीय . यंदा तरी किसनवीर व प्रतापगड सुरू होईल का याबाबत साशंकता आहे . सलग तीन हंगाम कारखाना बंद राहिल्याने येथील शेतकरी अडचणीत आला आहे . मात्र , किसनवीर प्रशासनाला त्याचे सोयरसुतक वाटत नाही . कारखाना चालवायला दिला म्हणून त्यांनी तीन वर्ष टाळा लावला , हे चालणार नाही . सहनशीलतेचा अंत झाला तर कारखान्याचे टाळे तोडल्याशिवाय राहणार नाही . " लढाई कोणी तरी केली पाहिजे , सातारा जिल्ह्यामध्ये लढण्याची भूमिका फक्त शशिकांत शिंदेच घेऊ शकतो . मी परिणामांचा विचार करत नाही . जिल्ह्याच्या प्रगतीचा विचार करतो . जरंडेश्वर कारखाना बंद झाला तर हजारो शेतकरी ऊस उपादकांचे मोठे नुकसान होईल म्हणूनच ही लढाई आहे , ही लढाई एकट्याने करून चालणार नाही , ती सर्वांना करावी लागेल , असेही श्री . शिंदे यांनी स्पष्ट केले . जावळीतील उसासाठी जरंडेश्वरच्या जास्तीत - जास्त तोडणी यंत्रणा उभी करून येथील उस शिल्लक राहणार नाही याची जबाबदारी घेतो , अशी हमी त्यांनी दिली . राजकारणासाठी ईडीने जरंडेश्वरवर कारवाई करू नये , अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्याची ताकद ईडीला दाखवून देऊ , असा इशाराही त्यांनी दिला . यावेळी अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमास तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे अनेक ज्येष्ट , पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies