सरसकट दुकाने खुली झाल्याने कोल्हापुरात गर्दीचा उच्चांक
भिमराव कांबळे -कोल्हापुर
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यानं प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवलेत. राज्य सरकारने शहर आणि ग्रामीण असे दोन प्रशासकीय विभाग करून शहरातील सर्व दुकाने सरसकट खुली करण्याची मागणी केली जात होती. याबाबत सोमवार दिनांक 28 जुलै रोजी व्यापारी संघटना आणि कोल्हापूर पोलीस दलाची संयुक्त बैठक पार पडली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. शहरातील विविध व्यापारी संघटनांनी देखील यासंदर्भात राज्य सरकारकड पाठपुरावा केला होता.
दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध व्यापारी संघटनांचे म्हणणे आणि कोल्हापुरातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांना सादर केल्यानंतर रविवारी रात्री उशिरा राज्य सरकारने कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने 5 ते 9 तारखेपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरू करण्यास परवानगी दिलीय. त्यामुळे आज सकाळी साडेसात वाजल्यापासूनच शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या महाद्वार रोड परिसरात तब्बल तीन महिन्यानंतर लोकांची गर्दी पाहायला मिळाली.