...…आणि आजीला दिसू लागलं!
- श्रीवर्धन तालुका कुणबी युवा संघटनेच्या प्रयत्नाने निराधार वयोवृध्द आजीचा डोळ्यातील मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले
कुणाल माळवदे-श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील वावेपंचतन गावातील देवकी आजी वय वर्ष ७५ ही निराधार असून तिची परिस्थिती खूप बिकट आहे. गावामध्ये मोडकळीस आलेली खोलीमध्ये सिझन प्रमाणे आलेल्या फळे- फुले विकून किंवा अन्य काही मेहनत करून या ठिकाणी राहत असून त्या ठिकाणी लाईटची सुविधा सुद्धा नाही. अशावस्थेत तिच्याकडे कोणतेच ओळखपत्र (रेशनकार्ड, आधारकार्ड, इलेक्शनकार्ड) नसल्यामुळे तिच्या डोळ्यातील मोतीबिंदू चे फ्री ऑपरेशन सरकारी किंवा कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून होऊ शकले नाही. ही बाब जाणून घेता कुणबी युवांनी देवकी आजीच्या ऑपरेशन ची जबाबदारी स्वीकारून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन यशस्वी झाले असून तिला आता दिसू लागले आहे.