शिवसेनेची ध्येयधोरणे ही घराघरातील लोकांपर्यंत पोहचवा उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आवाहन
प्रतीक मिसाळ सातारा
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले , सातारा जिल्हयात सेनेच्या संघटनीकरणासाठी सुरू झालेले शिवसंपर्क अभियानात शिवसैनिक मनापासून सक्रीय राहतील . सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला एकाकीपणा जाणवू देणार नाही . त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षसंघटना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिल अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली .कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेची जिल्हयात ताकत वाढविण्यासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही . सर्वसामान्य माणसाचे हित हा केंद्रबिंदू मानून पक्ष विस्तार आणि कार्यकर्ता सक्षमीकरणाचे व्यापक कार्यक्रम जोरदारपणे सुरु राहतील असे ठाम प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले .
शिवसेना उपनेते प्रा नितीन बानुगडे पाटील म्हणाले पक्ष विस्तार आणि संघटना बांधणी याचे पक्षीय आदेश वेळोवेळी अमलात आणले जात आहे . आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असून यावेळी शिवसेना आपले अस्तित्व पूर्ण ताकतीने दाखवून दिले जाईल असे प्रतिपादन नितीन बानुगडे यांनी केले .
शिवसंपर्क अभियानाची अधिकृत घोषणा उदय सामंत यांनी केली . या योजनेचा जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव व यशवंत घाडगे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केले . महिला आघाडीच्या संघटिका शारदा जाधव , तालुकाप्रमुख दत्ता नलावडे , अनिल गुजर , सातारा शहर प्रमुख निलेश मोरे , उपशहरप्रमुख अभिजीत सपकाळ , नितेश गादे , विभागप्रमुख सुमित नाईक , महिला संघटक रूपाताई लेंभे इं उपस्थित होते .