पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीच्या वतीने आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना छत्री,मास्क आदी साहित्याचे वाटप
सतीश पवार -इंदापूर
पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीच्या वतीने भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवणमध्ये आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना मास्क , छत्री व कोरोना बचावासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले . भिगवण ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी जिल्हा भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे , भाजप भटक्य विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक वणवे , पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे , सरपंच तानाजी वायसे , माजी सरपंच पराग जाधव , संपत बंडगर , प्रदेश सचिव दिनेश मारणे , जिल्हा उपाध्यक्ष संजय सकुंडे , मावळ तालुकाध्यक्ष अमोल भेगडे , आंबेगाव तालुकाध्यक्ष दिलीप यलभर , दौंड तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे , सचिव शशिकांत कुंटे , संदीप खुटाळे , अशोक पाचांगणे , माजी उपसरपंच जयदीप जाधव , हरिभाऊ पांढरे , जावेद शेख , बाळा भोसले , गुराप्पा पवार , भाजप भिगवण शहराध्यक्ष राजेंद्र जमदाडे , उपाध्यक्ष दिलीप कुंभार आदींसह भिगवण ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते .
भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे म्हणाले , जिल्ह्यामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भाजप कामगार आघाडीच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात येत आहेत . कोरोनाच्या कठिण काळात आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी उल्लेखनीय काम केले आहे . फ्रंटलाईन वर्कर असलेला हा घटक मात्र दुर्लक्षित राहिला आहे . भाजप कामगार आघाडीने आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना छत्री , मास्क कोरोनापासुन बचावासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले . प्रास्ताविक दिनेश मारणे यांनी केले , सुत्रसंचालन राजेंद्र जमदाडे यांनी केले तर आभार संदीप खुटाळे यांनी मानले . ज्ञानेश्वर मारकड , दिलीप कुंभार , गणेश खडके , रोहित बगाडे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले . आशा वर्कर व अंगणवाडी सेविका ऊन व पाऊस तसेच कोरोनाच्या कठिण काळांमध्ये अविरत काम करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप कामगार आघाडीच्या वतीने साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले .