माणदेशी फाउंडेशनच्या मोफत लसीकरणचा फायदा दहिवडी परिसरातील महिलांनी घ्यावा चेतना सिन्हा यांचं आवाहन
संदीप फडतरे-माण
माणदेशी फाउंडेशन म्हसवड व बेल एअर हॉस्पिटल पाचगणी यांच्या वतीने माण तालुक्यातील सर्व महिलांना मोफत लसीकरण करण्याचे काम सुरू असून म्हसवड परिसरात सुमारे ४००० हुन जास्त महिलांना याचा लाभ झाला असून आता दहिवडी व परिसरातील महिलांनी दि २१ , २२ व २३ जुलै रोजी होणाऱ्या मोफत लसीकरनाचा लाभ घेण्याचं आवाहन माणदेशी च्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दहिवडी ता माण येथील पत्रकार परिषदेत केलं . कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंब उधवस्त झाली असून अनेकांनी आपले प्राणही गमावले असताना सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून छोटासा खारीचा वाटा म्हणून माणदेशी संस्थेने हजारो गरीब कुटुंबाना शिधा वाटप , पीपीई किट , मोफत जेवण तसेच महिलांना रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीच्या गोळ्या सुद्धा पुरवल्या असून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीन हजार मास्क व दोन हजार लिटर स्यानिटायझर देण्यात आले . आहे या उपरोक्त गोंदवले खुर्द येथे माण तालुक्यात पहिले सुसज्ज कोवीड हॉस्पिटल उभारले . त्याचा बहुतांश रुग्णांना फायदा झाला . मोफत लस हि सिरम इन्स्टिटयूट पुणे यांची कोविशिल्ड हि देण्यात येणार आहे . तरी ज्या महिलांनी अदयाप पहिली लस घेतली नसेल . त्यांनी आपले नाव नोंदणी माणदेशी बँक गोंदवले व माणदेशी बँक दहिवडी संस्थेकडे करावी.मोफत लसीकरण शिबिर हे एकूण सलग चार दिवस चालणार असून सिरम इन्स्टिटयूट पुणे यांची लस सुरक्षित व शासन प्रमाणित आहे . हि लस दहिवडी येथील स्वाती मंगल कार्यालय येथे मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या उपस्थितीत दिली जाणार आहे . याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी व निसंकोच होवून जास्तीत जास्त महिलांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान चेतना सिन्हा यांचे वतीने करण्यात येत आहे .