जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांनसाठी पूर्ववत सुरु ठेवावा ,
ऊस उत्पादक शेतकरी , कामगारांच्या वतीने तहसीलदाराना निवेदन
राज्य व केंद्र सरकारने लक्ष घालण्याचं माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे आवाहन
प्रतीक मिसाळ -कोरेगाव
कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर या साखर कारखान्यावर ई डी ने मागील चार दिवसांपूर्वी केलेल्या जप्तीच्या कारवाई मुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले ऊस उत्पादक शेतकरी , कामगार पूर्ण पणे अडचणीत सापडले असून सदरचा साखर कारखाना हा बंद न करता पूर्ववत सुरू ठेवावा , या मागणीचे निवेदन माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्या वतीने वडूज तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेजस शिंदे , माजी सभापती संदीप मांडवे , माजी जि प सदस्य जितेंद्र पवार , प्रा.बंडा गोडसे , शशिकला जाधव , नियोजन मंडळाचे नंदृ मोरे , तालुका अध्यक्ष बाळासाहेब पोळ , सागर साळुखेआदींची उपस्थिती होती जरंडेश्वर साखर कारखान्यावर चार दिवसांपूर्वी ई डी ने केलेल्या जप्तीच्या कारवाईने कारखाना बंद राहिल्यास इतर तालुक्यातील तसेच खटाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी , कामगार , वाहतुकदार व कारख्यान्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो जणांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.सदरची कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आली असून खटाव सह संपुर्ण सातारा जिल्हयातील ऊस उत्पादक शेतक - यामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे . मागील २ वर्षापासून वेळेत व भरपूर पडणा - या पावसामुळे तालुक्यात प्रंचड प्रमाणात ऊस लागवड झालेली आहे . या वर्षी खटाव तालुक्यामध्ये साधारण ९ ते १० हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे . मागील हंगामात फक्त खटाव तालुक्यातुन दोन लाख एकोणतीस हजार टन ऊस जरंडेश्वर कारखान्यास गाळपासाठी शेतक - यांनी पाठवला होता.सदर कारखान्याचे व्यवस्थापन हे पारदर्शक व शिस्तबधअसल्यामुळे सदर कारखान्यास ऊस घालण्यासाठी शेतक - यांमध्ये प्रचंड चढाओढ असते . योग्य वजन , योग्य दर व वेळेत बिल दिल्यामुळे या कारखान्यावर शेतक - यांचा विश्वास वाढलेला आहे . " ई डी ने ही कार्यवाही थांबविली नाही व कारखाना वेळेवर ऊस गाळप करु शकला नाही . तर यावर्षी ऊस उत्पादक हजारो शेतकरी हे ऊस गाळपा पासून वंचित राहतील व त्यांचा ऊस शेतात पडून राहील.तसेच ऊस वाहतुक कंत्राटदार , तोडणी कंत्राटदार व कारखाना कर्मचारी या सर्वावर उपासमारीची वेळ येईल आधीच कोरोना या महामारीमुळे शेतकरी अडचणीत असताना जर हा कारखाना चालु राहीला नाही तर शेतक - यांना आत्महत्या करण्याशिवाय प्रर्याय राहणार नाही . तरी तात्काळ ई डी ने चुकीची केलेली ही कार्यवाही स्थगित करावी , मागे घ्यावी आणि कारखाना वेळेत गाळपासाठी चालू करुन तमाम ऊस उत्पादक शेतकरी , वाहतुकदार , तोडणी कामगार व कारखाना कर्मचारी यांना न्याय मिळवा अन्यथा नाईलाजास्तव आम्हास रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावे लागेल . " असंही या निवेदनात म्हटले आहे .