Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू ठेवण्यासाठी एकत्र येऊया:आ.शशिकांत शिंदे

 कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू ठेवण्यासाठी एकत्र येऊया:आ.शशिकांत शिंदे

जरेंडेश्वर साखर कारखाना चालू ठेवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत केले आव्हान

प्रतीक मिसाळ -कोरेगाव

जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ' ईडी'च्या चौकशीच्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे . ईडीच्या कारवाई बाबत शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी श्री . साईमंगल कार्यालय आरफळ ता . सातारा येथे ' पाटखळ - शिवथर ' विभागातील ऊसउत्पादक शेतकरी , कारखाना कामगार व वाहतूकदार यांची सर्वपक्षीय बैठक आमदार शशिकांत शिंदे यांनी बोलावली होती .

 या बैठकीस उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते . यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की,५० हजार शेतकऱ्यांचा ऊस त्यांच्या शेतात उभा असताना अतिशय चांगला चाललेला , एफआरपी पेक्षा अधिक दर देणारा कारखाना केवळ राजकारणासाठी बंद करण्याचा घाट घातला जातोय हे शेतकरी वर्गाला अस्वस्थ करणारे आहे . उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय मान्यवरांनी व शेतकऱ्यांनी ईडीविरोधात आंदोलन करण्याचे बोलून दाखवले .  लोकांमध्ये जनजगृती करून , कशाप्रकारे चांगला दर देणारा व शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असलेला कारखाना बंद पडण्याचा प्रयत्न केला जातोय हे सर्वांना पटवून द्या . काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही . जरंडेश्वर साखर कारखाना ईडीने जप्त करण्याचा प्रयत्न केल्यास ईडीला सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ . तसेच फक्त शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन उभं करायचं आहे , त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू ठेवण्यासाठी एकत्र येऊया , असे आवाहन यावेळी आमदार शिंदे यांनी केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies