कॅरिंग फ्रेंडस व टॉय बँक या ग्रुप तर्फे नितीन शहा मित्रमंडळींच्या सहकार्याने माथेरान मध्ये शालेय विद्यार्थ्यांना खेळणी वाटप
चंद्रकांत सुतार--माथेरान
कॅरिंग फ्रेंडस व टॉय बँक या ग्रुप तर्फे नितीन शहा मित्रमंडळींच्या सहकार्याने माथेरानच्या पहिली ते सातवी, व इंग्रजी माध्यमातील ज्युनियर केजी ते सातवी पर्यतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना खेळणी वाटप कार्यक्रम पार पडला.सकाळी 11 वाजता हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत माथेरान च्या प्रथम नागरिक प्रेरणा सावंत , तसेच नगरसेविका शिक्षण सभापती प्रतिभा घावरे, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, न्यानेश्वर बागडे, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, मुख्याध्यापक लक्षुमान ढेबे, कल्पना पाटील ,शिक्षक पालक वर्ग उपस्थित होते, नगराध्यक्ष प्रेरणा सावन्त सन्माननीय व्यक्ती च्या हस्ते, हस्ते विद्यार्थी पालकांना वर्गाप्रमाणे खेळणी वाटप करण्यात आली, एकूण ७०० खेळणी माथेरांच्या तीनही शाळेतील विद्यार्थ्यांनावाटप केले असले तरी शिल्लक खेळणी आदिवासी भागातील शाळेत वाटप करण्यात येणार आहे यावेळी कोरोनाच्या निर्भधामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता विद्यार्थ्यांच्या पालक वर्गांना शाळेत बोलविण्यात आले होते प्रत्येक वर्गाला वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्याने सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहिला, आजचा कार्यक्रमा साठी विशेष प्रयन्त सहकार्य येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन शहा यांचे लाभले सतत माथेरांच्या फक्त सामाजिक कार्याचा विचात ध्यानी मनी बाळगणारे , वर्षाच्या बारा महिन्यातील किमान 4 ते 5 वेळा तरी नितीन शहा आपल्या ओळखीने माथेरान वर प्रेम करणारे दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून विविध वस्तू , धान्य किट औषध, मेडिकल उपचार शाळेतील फी,शाळेसाठी उपयुक्त साहित्य अश्या अनेक विविध गोष्टींच्या स्वरूपातआपल्या दुकानात नियोजन बद्ध उपक्रम राबवत आहेत, सततच्या काहींना काही गोष्टींची वाटप करणे हे फार मोठे कार्य माथेरांच्या गरजू जनतेचा कैवारीच नितीन शहा यांच्या रूपाने माथेरान ला लाभल्याने माथेरान कर धन्य झाले आहेत,नेहमीच विविध माध्यमातील गरजु, गरीब ,व शाळांना विविध प्रकारची केलेल्या मदतीने आणि आज आगळा वेगळा खेळणी वाटप कार्यक्रमाने माथेरानकर भारावून गेले आहेत,