महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने अधिकारी महादेव घुले यांचा सन्मान
सतीश पवार-इंदापूर
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने उपमुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी महाराष्ट्र राज्य अपंग संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील राज्य सचिव परमेश्वर बाबर , उपाध्यक्ष महादेव सरवदे , डॉ . कोगणुलकर , सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंत अवघडे , प्राची थत्ते , राज्यसंचालक धनंजय घाटे , पुणे जिल्हाध्यक्ष , नानासाहेब मारकड , जिल्हा उपाध्यक्षा मीना चव्हाण , जिल्हा कार्याध्यक्ष सुहासजी संचेती , जिल्हा सचिव अजयजी वत्रे , प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग शिंदे नूतन इंदापूर तालुकाध्यक्ष रविंद्र शेलार , आंबेगाव तालुकाध्यक्ष शैलेंद्र चिखले , हवेली तालुका उपाध्यक्ष विनायक जाधव , अंगणवाडी ताई हिंजवडी देवकर ताई , आदींच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला .
पुणे जिल्हयातील मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी जिल्हा परीषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना स्थायित्व लाभ , आश्वासित प्रगती योजनेतील पहिला लाभ , दुसरा लाभ , तिसरा लाभ तसेच सर्व संवर्गातील पदोन्नती बाबतीत सर्व लाभ मिळवून दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला . तसेच संघटनेच्यावतीने दिव्यांग परीचर सवर्ग यांच्या पदोन्नतीबाबत आणि दिव्यांगाना उपकरण व तंत्रज्ञान साहित्य मिळावे याबाबत चर्चा करण्यात आली .