शिवसैनिकांनी शिवसेना शाखेच्या माध्यमातून समाजसेवा करून पक्ष वाढवावा - प्रा नितीन बानुगडे पाटील
संदीप फडतरे माण-खटाव
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दि १२ जुलै ते २२ जुलै अखेर शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून ८० टक्के समाज सेवा २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या तत्वानुसार काम करून पक्ष वाढवण्याचं आवाहन सातारा सांगली जिल्हा संपर्क प्रमुख , शिवसेना उपनेते प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी केले . शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियान च्या खटाव तालुका नूतन शिवसेना शाखा कातर खटाव येथील उद्घाटन प्रसंगी बानूगडे पाटील बोलत होते . यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव , उपजिल्हा प्रमुख संजय भोसले , तालुका प्रमुख युवराज पाटील , युवा नेते रविंद्र खाडे , शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती . शिवसंपर्क अभिमान अंतर्गत खटाव तालुक्यात १४ हुन अधिक नवीन शिवसेना शाखांचं उद्घाटन उद्घाटन प्रा नितीन बानुगडे पाटील व चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . या मध्ये पुसेसावळी , चौकीचा आंबा , सिद्धेवर कुरोली , मोराळे , पिंपरी , कातर खटाव आदी गावांचा समावेश आहे.आपल्या गावात उत्तम प्रकारे काम करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिवसैनिक यांना सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी दिली .