Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

लसीकरणाचा महिलांनी फायदा करून घ्यावा-चेतना सिन्हा यांचे आवाहन

लसीकरणाचा महिलांनी फायदा करून घ्यावा-चेतना सिन्हा यांचे आवाहन

 मिलिंदा पवार- खटाव

सर्व महिलांनी लसीकरणाचा फायदा करून घ्यावा असे आव्हान माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिन्हा यांनीं पत्रकार परिषदेत केला.

माणदेशी महिला फाउंडेशन हे महिलांसाठी जास्तीत जास्त काम करत असले तरीही अनेक सामाजिक कार्यात माणदेशी महिला फाउंडेशन सहभागी असते.

म्हसवड ,दहिवडी पाठोपाठ आता वडूजमध्येही मानदेशी  लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.

लसीकरणाचा पहिला टप्पा म्हसवड येथे 6200 महिलांना लस दिलेली असून दुसऱ्या टप्प्यात दहिवडी गोंदवले येथे तीन हजार महिलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे तिसरा टप्पा खटाव तालुक्यातील 3500 महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे लसीकरणासाठी नाव नोंदणी चालू आहे.

मानदेशी फाउंडेशन म्हसवड व बेल- एअर  हॉस्पिटल , पाचगणी यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत covid-19 लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येत आहे दिनांक 26 ,27 ,28 जुलै 2019 रोजी होणाऱ्या या लसीकरण याचा फायदा समस्त परिसरातील महिलांनी घ्यावा असे आवाहन मान देशी फाउंडेशन संस्थेच्या चेतना सिन्हा यांनी केले आहे.

  कोरोना महामारी च्या काळात  अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून अनेकांनी आपले प्राण गमावले असताना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून छोटासा खारीचा वाटा म्हणून मानदेशी संस्थेने प्रथम म्हसवड नंतर दहिवडी व आता वडूज परिसरातील मानदेशी रणरागिनी साठी लसीकरण मोहीम राबवीत असल्याचे संस्थेच्या कार्यकारी अधिकारी रेखाताई कुलकर्णी यांनी सांगितले.

आज सगळीकडे लसीकरण सुरू असून त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत महिलावर्गाला याचा मोठा त्रास होत आहे अपुरे लस उपलब्ध होत असल्याने महिलावर्गाला ताटकळत बसावे लागत आहे शिवाय दिवसभर थांबून शेवटी घरी परतावे लागत असल्याने मान देशी फाउंडेशन संस्थेच्या चेतना सिन्हा यांनी महिलांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे ठरविले व यासाठी बेल एअर हॉस्पिटल पाचगणी यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले म्हणून दिनांक 26 जुलै रोजी पासून सुरू होत असलेल्या मोफत शिबिरात समस्त मानदेशी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.

या लसीसाठी चेतना सिन्हा यांचे एप्रिल पासून प्रयत्न त्यांचे  सुरू होते व त्या प्रयत्नांना आत्ता यश आले आपणास देण्यात येणारी  सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांची व विषय असून ज्या महिलांनी अद्याप पहिली लस घेतली नसेल त्यांनी आपली नाव नोंदणी मान देशी फाउंडेशन संस्थेच्या वडूज कार्यालयांमध्ये करावी.

मानदेशी कोव्हिड लसीकरण शिबिर हे एकूण सलग तीन दिवस चालणार असून सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांची लस सुरक्षित व शासन प्रमाणित आहे ही लस मान्यताप्राप्त डॉक्टर यांच्या उपस्थितीत दिली जाणार आहे याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी व निसंकोच होऊन जास्तीत जास्त महिलांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन चेतना सिन्हा  यांचे वतीने करण्यात येत आहे.

लसीकरण स्थळ:- स्वयंवर मंगल कार्यालय वडूज (पुसेगाव रोड)

सकाळी साडेनऊ पासून सुरु व सायंकाळी साडेपाच पर्यंत

लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक महिलेस छान असे रोप मोफत

 अशाप्रकारे मान देशी फाउंडेशन तर्फे अतिशयमहिलांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे तसेच लसीकरणाची नोंदणीकरिता अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने नोंदणी करण्यात आली 23 तारखेपासून नोंदणी सुरू आहे सोशल डिस्टन्स पाळून व सर्व नियम पाळून ही नोंदणी अतिशय व्यवस्थित रीत्या सुरु आहे तरी सर्व खटाव तालुका व वडूज मधील महिलांनी लसीकरणाचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies