भाजपा पुणे शहर तर्फे आघाडी सरकारचा निषेध
गजानन गायकवाड -पुणे
महाराष्ट्र राज्यातलं महाविकास आघाडी सरकार राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाची फसवणूक करत आहे. भारतीय जनता पक्षाने ही फसवणूक उघडकीस आणली म्हणूनच सूड बुद्धीने भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आमदारांना निलंबित करण्याचा #महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचा पुणे शहर भाजपच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. ही दडपशाही आहे. महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा समोर आणल्यामुळेच सूडबुद्धीने विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी ही तुघलकी कारवाई करण्यात आली आहे.या विरोधात निषेध जाहीर करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, प्रभारी धिरज घाटे, सरचिटणीस गणेश घोष,राजेश येणपुरे,सुशिल मेंगडे, अर्चना पाटील, योगेश पिंगळे,गणेश कळमकर, धनंजय जाधव, प्रकाश बालवडकर,विकास लवटे, कुलदीप साळवेकर,नगरसेवक,मंडळ अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.