Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जावयाने केला सासऱ्याला ठार मच्छी कापण्याच्या कोयत्याने केले सपासप वार

 जावयाने केला सासऱ्याला ठार 

मच्छी कापण्याच्या कोयत्याने केले सपासप वार

रोहा तालुक्यातील घटना

अमूलकुमार जैन -अलिबाग


रोहा तालुक्यातील वरसे येथील  एकदंत छाया अपार्टमेंट मध्ये राहणा-या दुधाराम हरताजी घांची, वय 50 यांना त्यांच्या जावयाने धारधार  कोयत्याने जीवे ठार मारले. तर मयत घांची यांच्या पत्नी पोनीदेवी दुधाराम घांची 45 ह्या त्यांना वाचवीण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही वार करण्यात आले. त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे उपचार सुरु आहेत. 

शुक्रवारी दुपारी 1 वाजून 30 मिनीटांनी ही घटना एकदंत छाया या इमारतीच्या तळमजल्यावर  घडली.  सदर घटनेची खबर समजताच रोहा पोलीस घटनास्थळी पोहचून आरोपीला जेरबंद केले. वरसेत भरदिवसा ही क्रूर घटना घडल्याने रोहात खळबळ उडाली. 

वरसे येथे कौटुंबीक वादातून एका 32वर्षीय तरुणाने आपल्याच सासू सास-यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सासरा जागीच ठार झाला असुन सासू गंभीर जखमी झाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे व रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटना स्थळाची पाहणी केली असून सदर घटनेची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडघर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies