माथेरान मध्ये वृक्षारोपण
चंद्रकांत सुतार-माथेरान
चला एकच संकल्प करूया माथेरान हरित करूया या ब्रीद वाक्यनुसार आज माथेरान माउंट मेरी (दस्तुरी) ह्या मोकळ्या जागेत माथेरान गिरीस्थान नगर पालिका संयुक्त वन समिती च्या माध्यमातून चारशे विविध जातीच्या झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला माथेरान नगर परिषदेच्या प्रथम नागरिक सौ प्रेरणा सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरवात झाली दरवर्षी पावसाळ्यात माथेरान मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.एकदा लावण्यात आलेली रोपे जगतात की नाही,वृक्षारोपण कार्यक्रम पार पडल्यानंतर याकडे कुणी गांभीर्याने लक्ष केंद्रित करतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे.परंतु काही होईना माथेरान मध्ये हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पाडला जात आहे. याहीवेळी वनखात्याच्या माध्यमातून वन संरक्षक समितीने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला आहे.अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम येथील दस्तुरी नाक्याजवळच्या माऊंट बेरी परिसरात जवळपास चारशे रोपे लावण्यात आली आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे.माथेरान मध्ये अधिकाधिक फळांची रोपे लावल्यास याचा लाभ येथील विशेष आकर्षण असणाऱ्या माकडांना खाद्य म्हणून उपयोगात येऊ शकते जेणेकरून त्यांची क्षुधा यामुळेच भागू शकते. परंतु आणण्यात आलेली बहुतांश फळांची रोपे ही वृक्षारोपण कार्यक्रमा पूर्वीच माथेरानच्या खालील भागात राहणाऱ्या वृक्ष प्रेमींनी नेलेली असल्याचे समजते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करून आणण्यात आलेली रोपे व्यर्थ जात आहेत. माथेरान हे केवळ इथल्या घनदाट वनराई मुळेच प्रसिद्ध आहे.दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे अनेक जुनी झाडे उन्मळून पडतात त्यामुळे अनेक ठिकाणी मोकळे रान झालेले पहावयास मिळते.वृक्षारोपणाची खरी गरज ही माथेरान मध्ये आहे परंतु आणलेल्या रोपांची योग्यप्रकारे देखभाल न केल्यामुळे ही रोपे परिसरातील लोकांनी नेल्याचे समजते. वृक्षारोपण हे पुण्यकर्म असून लहान मुलांप्रमाणे त्यांची जोपासना केल्यास नक्कीच ती फलदायी ठरतात.माथेरान मधल्या वनराई मुळे शुद्ध ऑक्सिजन मोफत मिळत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घनदाट झाडीची आवश्यकता आहे याचं झाडीच्या शीतल गारव्या मुळे पर्यटकांना माथेरानची भुरळ पडते.पर्यटकांची संख्या वाढली तरच इथल्या सर्वसामान्य लोकांपासून उच्चभ्रू हॉटेल व्यावसायिक, श्रमिकांना रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे दरवर्षी करण्यात येणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन या रोपांचे सुयोग्यप्रकारे संवर्धन करणे आवश्यक बनले आहे.
सह्याद्रीच्या या डोंगरावरील रान जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत इथले पर्यटन अबाधित राहणार आहे अन्यथा इथे साधे पाखरू देखील फिरकणार नाही याकामी वनखात्याच्या अधिकारी वर्गाने त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या वन संरक्षक समिती मार्फत या रोपांचे उत्तम प्रकारे संवर्धन आणि देखभाल केल्यास माथेरान हे कायमस्वरूपी हरित आणि स्वच्छ हवेचे प्रदूषण मुक्त पर्यटनस्थळ आणखीन नावारूपाला येईल यात शंका नाही.
वृक्षारोपण साठी नवीन आणलेल्या नवीन झाडाच्या खर्चाच्या निम्मा खर्च हा त्याच्या संवर्धनासाठी जाळी , गेबियन वॉल निगा राखणे अश्या साठी खर्च केला पाहिजे तरचखऱ्या अर्थाने वृक्षारोपन केल्याने सार्थक होईल .
प्रेरणा प्रसाद सावंत
नगराध्यक्ष माथेरान न.पा.
-----------------------------------
माथेरान च्या घनदाट जंगलात अनेक मोठं मोठाले झाडे आहेत त्याच्या बियाखाली पडत असतात त्याचे छोटे रोप तयार होतात तेचे रोपे जर आपण येथे वापरात आणली तर दर वर्षी नवीन झाडा साठी वृक्षारोपण चा खर्च टाळू शकतो
ज्ञानेश्वर बागडे--सामाजिक कार्यकर्ते
---------------------------------
वन समिती मार्फत मागील काळात पेनोराम पॉईंट, लुईझा पॉईंट, गारबट पॉईंट येथे,वृक्षारोपण केले होते तेथील झाडे जंगली आहेत त्याचे संवर्धन केल्यामुळे तेथील झाडे जंगली आहेत, त्याच प्रमाणे माऊंट बेरी येथील आजच्या वृक्षारोपणचे संवर्धन निगा राखली जाईल
योगेश जाधव वन समिती अध्यक्ष माथेरान
प्रेरणा प्रसाद सावंत
नगराध्यक्ष माथेरान न.पा.
-----------------------------------
माथेरान च्या घनदाट जंगलात अनेक मोठं मोठाले झाडे आहेत त्याच्या बियाखाली पडत असतात त्याचे छोटे रोप तयार होतात तेचे रोपे जर आपण येथे वापरात आणली तर दर वर्षी नवीन झाडा साठी वृक्षारोपण चा खर्च टाळू शकतो
ज्ञानेश्वर बागडे--सामाजिक कार्यकर्ते
---------------------------------
वन समिती मार्फत मागील काळात पेनोराम पॉईंट, लुईझा पॉईंट, गारबट पॉईंट येथे,वृक्षारोपण केले होते तेथील झाडे जंगली आहेत त्याचे संवर्धन केल्यामुळे तेथील झाडे जंगली आहेत, त्याच प्रमाणे माऊंट बेरी येथील आजच्या वृक्षारोपणचे संवर्धन निगा राखली जाईल
योगेश जाधव वन समिती अध्यक्ष माथेरान