कोरेगाव मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सबलीकरनासाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध:आ.शशिकांत शिंदे
प्रतीक मिसाळ कोरेगाव
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सक्षम करण्याचा निर्णय घेतला असून , कोरेगाव मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन , सातारारोड आणि किन्हई , सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन व खटाव तालुक्यातील डिस्कळ , पुसेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुसज्ज रुग्णवाहीकांचे पूजन करून वितरण करण्यात आले . यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की;कोरेगाव तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळेस आरोग्य विभागाने अत्यंत चांगले काम केले आहे . लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचे पालन करत कोरोना हटवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे . ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण करत असताना , रुग्णवाहिकांची उपलब्धता नव्हती , ज्या होत्या त्यांची चालन क्षमता कमी झाली होती , त्यामुळे नवीन रुग्णवाहिका जिल्हा परिषदेने घ्याव्यात यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता , तसेच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या . जिल्हा परिषदेने सातारा जिल्ह्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका खरेदी केल्या असून , कोरेगाव तालुक्यासह या मतदारसंघातील जवळपास सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या उपलब्ध झाल्या आहेत . नजीकच्या काळात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे . कोरेगाव तालुक्यासह या मतदारसंघातील कोरोना हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाला पाठबळ दिले जाईल , अशी ग्वाही पुसेगाव येथील रुग्णवाहीचे लोकार्पण करताना दिली .