बाजार समितीचे सभापती नवनाथ मस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण
सुधीर पाटील -सांगली
राज्यमंत्री नामदार बच्चू (भाऊ ) कडू यांच्या वाढदिवसा निमित्त निमणी येथे वृक्षारोपन तासगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.नवनाथ ( भाऊ ) मस्के यांच्या हस्ते करण्यात आले . अपंगाचे दैवत शेतकरी ,कष्टकरी ,कामगार ,शोषीत ,पिडीत ,वंचित ,अनाथ ,विधवा माता भागिनी या सर्वांच्यासाठी बच्चूभाऊंचे काम अतिशय उल्लेखनिय आहे .असे गौरव पर उदगार सभापती नवनाथ मस्के यांनी काढले . यावेळी निमणी गावचे सरपंच विजय पाटील, डॉ. दिपक पाटील, डी.ए. पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल शेळके, सचिन पाटील ,नितिन शेळके, दशरथ पाटील ,नामदेव जमदाडे ,सुनिल पाटील .प्रशांत महाडीक ,रत्नाकर गुरव ,संतोष पवार ,चंद्रकांत यादव (सर ) प्रविन राजमाने ,शंकर (दादा ) राजमाने ,अनिल पाटील ( कुमठेकर ) प्रहार जनशक्ति पक्षाचे तासगांव तालुका अध्यक्ष सुधीर पाटील, पश्चिम विभागप्रमुख उदय पाटील निमणी ,अध्यक्ष संतोष सावंत ,नेहरूनगर अध्यक्ष धनाजी पाटील, उदय (राजमाने ) पाटील ,गणेश पवार ,संदीप साळुंखे, अथर्व शेळके आदि उपस्थित होते.