प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे मोबदला मिळवून देण्यासाठी सुनिल गोगटे यांच्याकडे साकडे
अनेक वर्ष उलटूनही शेतकरी मोबदल्यापासून वंचित
नरेश कोळंबे -कर्जत
शहापूर कशेळे कर्जत पळसदरीमार्गे हाळ खोपोली वाकण फाटा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ अ असा होत असून कर्जत पळसदरी हाळ जुना राज्यमार्ग क्र 35 असा होता. तेथील नांगुर्ले पळसदरी नावंडे तळवली डोलवली अंजरुण हाळ येथील शेतकऱ्यांच्या जागा २०१२-१३ पासुन संपादित केल्या गेल्या होत्या , त्याचा योग्य मोबदला त्यांना आजतागायत मिळालेला नाही. त्यांनी तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी एमएमआरडीए, एमएस आरडीसी, एनएचएआई या सर्व ठिकाणी अर्ज विनंत्या करून सुध्दा त्यांच्या हक्काचा मोबादला त्यांना मिळाला नाही. दिनांक २ जुलै २०२१ रोजी त्यांनी रस्ते विकास महामंडळाचे मंत्री मा. एकनाथ जी शिंदे साहेब यांची भेट घेतली परंतु त्याना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते सुनिल गोगटे यांचे कडे धाव घेऊन त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी विनंती केली.
त्यावर त्यांना सुनिल गोगटे यांनी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब , विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण जी दरेकर साहेब, तसेच माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लवकरच मोबदला मिळवून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी किरण हडप, इरफान जळगावकर , मोहम्मद मुल्ला , विलास महाब्दी, बाळाराम हडप , इस्माईल करंजीकर, अकबर करंजीकर आदी शेतकरी उपस्थित होते.