Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कुठल्याही गटाची संघटना न वाढवता राजसाहेबांवर निष्ठा असणंऱ्यांची संघटना वाढवायची आहे : वैभव खेडेकर

कुठल्याही गटाची संघटना न वाढवता राजसाहेबांवर निष्ठा असणंऱ्यांची संघटना वाढवायची आहे : वैभव खेडेकर

 विद्यार्थी संघटना बैठकीत पक्ष बदलणाऱ्या आदित्य शिरोडकरांचा सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतला समाचार

 ओंकार रेळेकर-चिपळूण


आपल्याला जिल्ह्यात कुठल्याही गटाची संघटना वाढवायची नाही तर  राजसाहेबांवर निष्ठा असणाऱ्यांची संघटना वाढवायची आहे.हिरा आहे तो चमकणारच पक्षाचे जोमाने काम करा पुढे चांगली संधी आहे. आदित्य शिरोडकर यांच्या जाण्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटना अधिक जोमाने काम करेल पक्षात पद, पैसे,मानसन्मान मिळवून जे सोडून गेले त्यांचा पक्षावर काहीही परिणाम झाला नाही रत्नागिरी जिल्हयातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षावरच निष्ठा ठेऊन प्रामाणिक आहेत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस खेडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले.

                आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर  महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी संघटनेची महत्वपूर्ण बैठक शहरातील अतिथी सभागृह येथे रविवारी सायंकाळी संपन्न झाली या बैठकीला जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे,नगराध्यक्ष वैभव खेडेकर,चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष नलावडे,विद्यार्थी संघटना राज्य उपाध्यक्ष शैलेश धारिया,कामगार सेना चिटणीस संदीप फडतले,एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष सुनील साळवी ,रुपेश जाधव,उत्तर दक्षिण जिल्हा अध्यक्ष पुष्पेंद्र दिवटे,गुरुप्रसाद चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिपळूण तालुक्यातील असंख्य नागरिकांनी  

मनसे मध्ये प्रवेश केला.पुष्पगुच्छ आणि पक्षाचा पताका देऊन वैभव खेडेकर यांच्या हस्ते यांचा पक्षप्रवेश झाला.

         आगामी काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आजची तातडीची सभा आयोजित केली आहे. आजच्या १५  वर्षाच्या कालखंडामध्ये पक्षाला असे अनेक धक्के बसले राजसाहेबांच्या ताटात जेवणारे पाठीत खंजीर खुपसून गेले अनेक वादळे ,संकटे आली अशा परिस्थितीती पक्ष वाटचाल करीत आहे आम्ही या वाटचालीमधील एक चिरा आहोत आमच्यावरती संकटे आली सहकारी आम्हाला सोडून गेले जीवघेणे हल्ले झाले आरोप झाले परंतु राजसाहेबांवरील पक्षनिष्ठा कधी सोडली नाही पलीकडच्या अनेक पक्षांनी माझ्यावर डोळा ठेवला खूप  प्रयत्न केले परंतु त्यांना ते जमले नाही आदित्य शिरोडकर यांच्या सारख्या माणसांना राजसाहेबांकडून पक्षात पद, प्रतिष्ठा,पैसा या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि जेव्हा हे सर्व मिळेनासे झाले त्यावेळी स्वतःची निष्ठा विकून दुसऱ्या पक्षात गेले खरेतर या माणसाला  राजसाहेबानी अंगा खांद्यावर खेळवले,मोठे केले मला वाटले न्हवते ही माणसे पक्षाचा विश्वासघात करतील अख्या राज्याचे विद्यार्थी संघटनेचे पद त्यांना देण्यात आले राजकारण, समाजकारण त्यांचा पिंड नसावा फक्त कॉर्पोरेट स्तरावर काम करणे त्यांचा विषय असावा ज्याला गोर,गरीब लोकांच्या भावना काय असतात हे कळले नाही त्यांना पक्ष वाढविणे अवघड वाटल्याने पक्ष सोडून गेले परंतु रत्नागिरी जिल्हयाच्या संघटनेवर याचा कुठलाही परिणाम झालेला नाही सर्वच चिरे अभेद्य आहेत हाच आमचा आज ही  बैठक घेण्याचा उद्देश होता असे सांगूनविद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अधिक जोमाने काम करतील असे वैभव खेडेकर म्हणाले 

             आपण म्हणतो पक्ष बद्दलणाऱ्यांवर आपण काही बोलू नये आरोप करू नये परंतु एवढी आपली काही मवाळ संघटना नाही आपण आरे ला कारे करणारे आहोत याच्या पुढे जर कोणी असे धाडस केले तर त्याला जशाच तशा पद्धतीने उत्तर दिले पाहिजे त्याला त्याच ठिकाणी अद्दल घडवली पाहिजे म्हणजे आपल्या पक्षाने मोठा केलेला कार्यकर्ता त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात जाण्याचे धाडस करणार नाही अशा लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे हे दाखवून दिले पाहिजे असे खेडेकर म्हणाले

        जे गेले ते बरे झाले ग्रहण सुटले परंतु मला वाटतं विद्यार्थीसेनेला सवय ही त्या आदित्य शिरोडकरांसारखीच  लागली होती वाटचाल देखील त्या पद्धतीने संथ होती जर का आपले म्हणणे आहे अमितजीकडे संघटनेची सूत्रे द्यायला पाहिजेत तर त्यांच्या सारखे सळसळते काम केले पाहिजे.आज आम्ही पक्षात काम करतांना आंदोलनातून  अनेक गुन्हे आमच्यावर दाखल झाले एसटी चालकांचे आंदोलन,चालक भरती आंदोलन,शिक्षण सेवक भरती,ग्रामसेवक भरती असू दे ,खड्डे बुजविणे आंदोलन अशी अनेक आंदोलने आम्ही केली त्या काळात एक वेगळी सळसळ आम्ही निर्माण केली होती यातून आंदोलने झाली आणि भूमिपुत्रांना नोकऱ्या लागल्या याच माध्यमातून पक्ष संघटना वाढली असे खेडेकर म्हणाले.

संतोष नलावडे यांचे कौतुक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये संतोष नलावडे यांचे मागील अनेक वर्षाचे काम अतिशय उत्तम आहे ,शिरोडकर यांच्या पक्ष बदलण्याच्या विषयांतर नलावडे यांनी अगदी कमी कालावधीत आजच्या विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन केले आणि कार्यकर्तेही उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.जिथे जिथे गरज लागेल तिथे पक्ष पूर्णपणे संतोष नलावडे यांना ताकत देईल अशा शब्दात मनसेचे राज्य सरचिटणीस नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष नलावडे यांचे कौतुक केले.

 

कार्यकर्त्यांना कानपिचक्या

विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सळसळत्या रक्ताने काम केले पाहिजे गावा गावात जाऊन आपले संपर्क अभियान राबवायला पाहिजे राजसाहेबांचे विचार अमितजींचे काम हे घराघरात गेले पाहिजे.

नुसती पद घेऊन या गटाचा का त्या गटाचा असा बालिश विचार मनामध्ये आणू नका जो हिरा आहे तो चमकायचा आहे तो चमकणारच त्याला कुणाचा वरून हात फिरविण्याची गरज नाही पक्षात मी अनेक चेले पाहिले जे गटबाजीकडे झुकले ते आयुष्यातुन उठले राजसाहेबांवर निष्ठा ठेऊन काम करा

कार्यकर्त्यानी फक्त पदे मिरविण्यासाठी घेऊ नयेत लोकांचे प्रश्न सोडावा,आंदोलने करा,विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्या कॉलेज युनिट मध्ये प्रवेश करून घ्या ,नवीन चेहऱ्यांना संधी द्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यानी सळसळत्या रक्ताने काम केले पाहिजे तरच लोक जवळ येतील विद्यार्थी सेना हे असे अंग आहे की ते पुढे कार्यकर्त्यांला घडविते दररोज पक्ष बदलणाऱ्या अशा लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे हे दाखवून द्या अशा वैभव खेडेकर यांनी आपल्या दमदार भाषणात मरगळलेल्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या

काम न करणाऱ्यांची होणार उचलबांगडी

 बैठकीला जे आले नाहीत ज्यांना पक्षसंघटना,नेतृत्व माहीत नसेल अशा सर्व पदाधिकाऱ्याची  उचलबांगडी करा आणि या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी द्या  जे पदाधिकारी गटबाजी मध्ये आहेत त्यांना पदावरून दूर करा असे वैभव खेडेकर यांनी संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे यांना सांगितले, आपल्याला या ठिकाणी राजसाहेबांवर निष्ठा असलेल्यांची संघटना बांधायची आहे कुठल्याही गटाची संघटना बांधायची नाही आपण जोमाने कामाला लागा पक्ष आपल्या मागे आहे.अमितजींना अभिप्रेत असलेली संघटना आपल्याला बांधायची आहे.असे खेडेकर म्हणाले.या वेळी चिपळूण शहराध्यक्ष गणेश भोंदे,चिपळूूूण उपतालुुकाध्यक्ष अभिनव भुरण, खेड शहराध्यक्ष प्रसाद शेट्ये,राजू आंब्रे,मनसेचे बोरगाव सरपंच सुनील हळदणकर, महिला आघाडीच्या श्रावणी चिपळूणकर ,उपशहराध्यक्ष सौ वृषाली सावंत,युवती तालुकाध्यक्ष अस्मिता पेंढाबकर सुनील हळदणकर शहर  म. न .वि से उपजिल्हा अध्यक्ष निलेश मोरे तालुका अध्यक्ष अमोल आवेरे शहर अध्यक्ष गुरू पाटील उपतालुका अध्यक्ष गुरू नागे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies