Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

हायस्पीड बुलेट ट्रेनला नेमकीजागा लागणार किती ? सातबारा उताऱ्यांची यादी पाहून लोकांच्या तोंडचे पाणी पळाले पृथ्वीराज जाचक यांनी केली विरोधाला सुरुवात !

हायस्पीड बुलेट ट्रेनला नेमकीजागा लागणार किती ? सातबारा उताऱ्यांची यादी पाहून लोकांच्या तोंडचे पाणी पळाले 
पृथ्वीराज जाचक यांनी केली विरोधाला सुरुवात !

सतीश पवार -बारामती

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन च्या भूसंपादनाच्या दृष्टीने अत्यंत वेगाने पावले उचलली जात आहेत . त्या दृष्टीने सध्या विविध संस्थांकडून प्रकल्पाच्या बाधित व शेजारच्या शेतकऱ्यांची व कुटुंबीयांचे सामाजिक सर्वेक्षण सुरू आहे . या प्रकल्पामुळे नेमके काय सामाजिक व वैयक्तिक परिणाम होतील याची चाचपणी सध्या सुरू आहे , मात्र यासाठी मागवली जात असलेली सातबारा उतारे आणि त्यांची यादी लक्षात घेता किमान दोन हजार फूट रुंदी मधील सातबारा उताऱ्यांच्या मालकांची माहिती घेतली जात आहे . त्यामुळेच एकीकडे सामाजिक सर्वेक्षण होतानाच दूसरीकडे विरोध आणि होकार या दोन्हींची सरमिसळ होऊ लागली आहे . अनेकांची घरे उठतील ही भीती यामागे आहे . त्यामुळेच विरोधाला देखील सुरुवात झाली आहे , तर दुसरीकडे सध्या असलेल्या जमिनींच्या व घरांच्या किमतींपेक्षा अधिक पटीने जमिनीचा मोबदला मिळणार असल्याने आतापासूनच शेतकरी आपली जमीन कशी संपादन होईल याकडे उत्सुकतेने पाहू लागले आहेत . नुकत्याच भूसंपादन झालेल्या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील जमिनीच्या मोबदल्याचा विचार करता विरोधापेक्षा शेतकरी जास्तीचा पैसा कसा मिळेल याकडे पाहू लागले आहेत . कारण जमिनीच्या सध्याच्या असणाऱ्या किमतीपेक्षा भूसंपादन मोबदला अधिक मिळालेला आहे . देखील यामागे आहे .

मागील दोन दिवसात आयआयएमईआर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने प्रकल्पबाधित गावांमधील सामाजिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे . हे करताना प्रकल्पामध्ये जाणाऱ्या जमिनींच्या सातबारा उताऱ्याची यादी घेऊन संबंधित संस्थांचे स्वयंसेवक हे सर्वेक्षण करत आहेत . मात्र ही यादी मोठी आहे . प्रत्यक्षात प्रकल्प कमी जागेत होणार आणि जाणारी जमीन त्याहून कमी जाईल असे सांगितले जाते , मात्र या जमिनींच्या भूसंपादनामुळे नेमके काय सामाजिक परिणाम होतील याची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांकडून सरकार घेईल . यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक लोकांचा होकार आला तर हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न सरकार करेल . मात्र प्रत्यक्षात त्यांची जमीन जाईलच असे नाही , असेही सांगितले जात आहे . त्या पार्श्वभूमीवर आता हायस्पीड बुलेट ट्रेनला होणारा विरोध विरोध देखील हायस्पीड च्या दिशेने वाढला आहे . राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी यात उडी घेतली असून , बागायती जमीनचे सरकार वाटोळे करणार असेल , तर हे कदापि होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला आहे . जाचक म्हणाले , ज्या पद्धतीने हा प्रकल्प पुढे रेटला जात आहे , ते पाहता त्याचीही भीमा नीरा जलस्थिरीकरणासारखाच अवस्था होईल . त्यातून कोणताही फायदा होणार नाही , मात्र अनेकांची घरे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत . अनेक गावांचे दोन दोन भाग पडतील . अनेकांची घरे उद्ध्वस्त होतील . त्यामुळे कोणत्या तरी राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून याला पाठबळ देणे अत्यंत घातक ठरेल . ते पुढील पिढीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरेल . येथील जमिनीच्या किमती घेऊन इतर ठिकाणी जमिनी देण्याची स्वप्ने पहात असतील तर तसेही होणार नाही . त्यामुळेच हा प्रकल्प पूर्ण बागायती भाग असलेल्या भागात होणारा व अन्नपाण्यावर असलेल्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडणारा ठरणार असल्याने त्याला आमचा प्रचंड विरोध राहील . '

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies