औंध येथे चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचे उदघाटन.
गजानन गायकवाड -पुणे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने औंध येथे उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचे उदघाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.
लहान मुलांना रस्ते, ट्रॅफिक बाबतच्या नियमांचे शिक्षण मिळावे या उद्देशाने भव्य आणि सुसज्ज अशा चिल्ड्रनपार्कची निर्मिती नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.पुणे मनपा ने २०१७ नंतर अशी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील व शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, योगेश टिळेकर,सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,उपमहापौर सुनिता वाडेकर, यांच्यासह शहर सरचिटणीस, पदाधिकारी, नगरसेवक व स्थानिक उपस्थित होते.