जबरदस्त ! Blaupunkt ने भारतात लाँच केला ५० Inch चा ४K टीव्ही, पाहा किंमत-फीचर्स
ज्ञान-तंत्रज्ञान
अनुप ढम
जर्मन ब्रँड Blaupunkt ने भारतात नवीन ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे जो अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये ४k रिझोल्यूशन आहे. Blaupunktचा हा ५० इंचाचा टीव्ही ६ ऑगस्टपासून केवळ फ्लिपकार्टवर विकला जाईल. या टीव्हीची किंमत ३६,९९९ रुपये आहे. या टीव्हीमध्ये २ जीबी रॅमसह ८ जीबी स्टोरेज मिळेल. डिस्प्लेची ब्राईटनेस ५०० nits आहे आणि टीव्हीमध्ये १०००+ अॅप्सच्या समर्थनासह इनबिल्ट क्रोमकास्ट आणि एअरप्ले आहे. टीव्हीसोबत येणाऱ्या रिमोटमध्ये व्हॉइस कंट्रोल देखील आहे.
Blaupunkt च्या या ५० इंचाच्या टीव्हीमध्ये अँड्रॉइड १० देण्यात आला आहे. याशिवाय यात बेझललेस डिस्प्ले आहे. टीव्हीसोबत ६० W चा मजबूत स्पीकर देण्यात आला आहे, ज्यामध्ये डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रूसराउंड ऑडिओ, डॉल्बी एमएस १२ साउंडसाठी सपोर्ट आहे. डॉल्बी एटमॉससाठी देखील समर्थन आहे. या टीव्हीमध्ये एकूण ४ स्पीकर्स आहेत. गेल्या महिन्यातच Blaupunkt ने भारतात चार 'मेड-इन-इंडिया' अँड्रॉइड टीव्ही सादर केले. Blaupunktच्या या चार अँड्रॉइड टीव्ही मॉडेल्सची सुरुवातीची किंमत १४,९९९ रुपये आहे म्हणजेच ३२ इंच एचडी रेडी सायबरसाऊंड अँड्रॉइड टीव्ही, ४२ इंच एफएचडी अँड्रॉइड टीव्हीची किंमत २१,९९९ रुपये आणि ४३ इंच सायबरसाउंड ४ के अँड्रॉइड टीव्हीची किंमत ३०,९९९ रुपये आहे. आणि ५५ इंच 4K अँड्रॉइड टीव्हीची किंमत ४०,९९९ रुपये आहे