Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

एनडीआरफच्या पथकाचे जिल्हा प्रशासनाने मानले आभार ; जिल्हाधिकारी यांनी केले कौतुक

 एनडीआरफच्या पथकाचे जिल्हा प्रशासनाने मानले आभार ; जिल्हाधिकारी यांनी केले कौतुक 

प्रतीक मिसाळ-सातारा


अतिवृष्टीमुळे कराड , पाटण , वाई , महाबळेश्वर व जावली या तालुक्यात पुरपरिस्थिती तसेच भूस्खलन होऊन आणि दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात आपत्ती निर्माण झालेली होती . या आपत्तीच्या काळात एनडीआरफच्या पथकांमार्फत अतिशय बहुमुल्य स्वरुपाची मदत झालेली आहे . त्याबद्दल जिल्हा प्रशासनाने पुणे येथील 05 बटालियनचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांचे आभार मानले आहेत . या आभाराचे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज दिले . या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते . पाटण तालुक्यातील मिरगाव , ढोकावळे , अंबेघर तर्फ मरळी तसेच जावली तालुक्यातील रेंगडी आणि वाई तालुक्यातील जोर व कोंढावळे या गावांमध्ये भूस्खलन होऊन जिवित व वित्तहानी झालेली होती . या ठिकाणी पुणे येथील एनडीआरफच्या पथकांमार्फत तात्काळ शोध व बचाव आणि मदत कार्य पार पडून या ठिकाणच्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले . तसेच मृत व्यक्तींचा शोध घेण्याचे काम हे अत्यंत कमी कालावधीत पार पडले . आपत्तीच्या कालावधीत एनडीआरफच्या पथकांमार्फत बहुमुल्य स्वरुपाची मदत झालेली आहे त्याबद्दल आज जिल्हा प्रशासनातर्फे आभाराचे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते देण्यात आले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies