माणगावकरांची मरण यातना इथे संपत नाही!
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत तालुक्यातील माणगाव या गावात आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात ही स्मशानभूमी पर्यंत जायला पक्का रस्ता नाही . काट्या कुट्यातून आणि चिखल पाण्यामधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमी पर्यंत जावे लागत असल्याने ही माणगाव गावी राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांची व मृत झालेल्या सर्वांची उपेक्षाच आहे.
कर्जत नेरळ या महत्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती असलेल्या माणगाव या गावात आजही लोकांना मूलभूत असलेल्या सोयी सुविधाची पूर्तता होताना दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. या ऐन पावसाळ्यात एखादा व्यक्ती मृत झाल्यास त्या मृत व्यक्ती ला घेऊन जाणाऱ्या सर्वांना अगदी अथक मेहनत घेऊन चिकट व चिखलातून व्यवस्थित चालून स्मशानभूमी पर्यंत जावे लागत आहे. स्मशान भूमी पर्यंत पोहचणे म्हणजेच मोठे दिव्य पार करावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामस्थ तसेच बाहेरून येणारे नातेवाईक यांना रस्ता आणि चिकट चिखल ह्या मधून रस्ता शोधत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत पोचावे लागत असल्याने सर्वांनी या विषयी नाराजी व्यक्त करत प्रशासनाचे वाभाडे काढले आणि मरणांत होणाऱ्या या उपेक्षेची जाणीव ठेऊन हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा अशी मागणी लोक करत आहेत.
" बऱ्याच वर्षांपासून ह्या रस्त्याचे काम बाकी आहे. काम करायला कोणीही धजावत नाहीत . ह्या रस्त्याच्या मध्यवर्ती असलेल्या लोकांच्या मालकी हक्काच्या जमिनीमध्ये हा रस्ता येत असल्याने मालक त्या रस्त्यासाठी जागा सोडू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांच्यासकट सर्व माणगाव गावाला हा त्रास सहन करावा लागत आहे."
--ग्रामस्थ माणगाव
--ग्रामस्थ माणगाव