डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन
@ मिलिंद लोहार-सातारा
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन झाले. त्या धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या अभ्यासक डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे आज रोजी वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर उद्या, गुरुवार ता. 26 रोजी सकाळी 10 वाजता कासेगाव येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सर्व श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाचे अभ्यासक डॉ. भारत पाटणकर यांच्या त्या पत्नी होत.
मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी इ.स. 1983 मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.