पोलादपूर मधील साखर सुतारवाडी व केवनाळे व महाड मधील तळीये भागाची जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केली पाहणी
आतापर्यंत केलेल्या व यापुढे करावयाच्या उपाययोजनांची घेतली माहिती
महाराष्ट्र मिरर टीम
पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे तसेच महाड मधील तळीये या दरडग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज पाहणी केली. याशिवाय त्यांनी महाड शहराचीही पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या व यापुढे करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व येथील नागरिकांना शासकीय सोयी-सुविधा देण्याबाबत आश्वस्त केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद, पोलादपूर प्र.तहसिलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी श्रीमती वृषाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी गुलाबराव सोनवणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.