डॉ. जाधवकृत ' ऋणानुबंध कुष्ठमुक्तांशी ' हे कुष्ठरोग्यांना आत्मबल देणारे पुस्तक-- डॉ. विकास आमटे
राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर
व्यासपीठावर डॉ. भारती आमटे, आनंदवन स्नेही डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. विजय पोळ, आनंदवनाचे विश्वस्त सदाशिवराव ताजने, सुधाकर कडू, डॉ. वाय एस.जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ आमटे यांनी नवीन कुष्ठरुग्णांचे प्रमाण नव्हे तर विकृती असणारे रुग्ण वाढत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, कुष्ठरोग म्हणजे फाशीची शिक्षा, कॅन्सर म्हणजे कॅपिटल पनिशमेन्ट. जगात कॅन्सर विलेज कुठेच नसल्याने बाबाच्या सालोरी येथील ७ एकर परंपरागत जागेवर कॅन्सर विलेज स्थापन करून बाबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. वाय. एस. जाधव म्हणाले की, आपल्या कुष्ठसेवेच्या सुरुवातीच्या काळातील कृष्ठपीडितांच्या जीवनावर आजारामुळे होणाऱ्या नकारार्थी परिणामाच्या अवलोकनाने प्रभावित होऊन त्यांच्या समुदायाधिष्ठित पुनर्वसनाचे प्रयोग सहकर्मी, अधिकारी समाजसेवी संस्था आणि समाजसेवकाच्या सहकार्याने पूर्ण केले. त्या प्रयोगाचा लेखाजोखा ' ऋणानुबंध कुष्ठमुक्तांशी ' या पुस्तकाच्या माध्यमातून मांडल्याचे ते बोलले. पद्मश्री स्व. बाबा आमटे आणि आनंदवनने त्यांच्या मनावर अमिट छाप सोडण्याचा त्यांनी आपल्या भाषणातून आवर्जून उल्लेख केला.
जगप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्यावर प्रबंध लिहून आचार्य पदवी मिळविणारे लातूरचे डॉ. रोडे यांनी आनंदवनने केलेल्या उत्तुंग कामगिरीचे नेटक्या शब्दात विवेचन केले तसेच डॉ. जाधव यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात आनंदवन मित्र मंडळ वरोऱ्याचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य बळवंतराव शेलवटकर, प्रा. सचिन जाधव, संगीता गोल्हर, लिला जाधव, तुषार मर्दाने, आनंदवन कार्यकर्ता माधव कवीश्वर, प्रशांत देशमुख, राजेश ताजने, रोहीत फरताडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंदवन मित्र मंडळाचे सचिव तथा पत्रकार राजेंद्र मर्दाने यांनी केले तर आभार आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी मानले.