-स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नीला मागील सहा महिन्यांपासून पेन्शनच नाही
चंद्रकांत सुतार -माथेरान
देश 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना माथेरानमध्ये स्वातंत्र्य सैनिक धोंडू पवार यांच्या विधवा पत्नीस मागील सहा महिन्यांपासून मिळणारी पेन्शनच मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ही पेन्शन मिळावी ह्यासाठी माथेरानचे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झालेल्या वीरांच्या पत्नीस शासनाने स्वातंत्र्य सन्मान योजने अंतर्गत पेन्शन सुरू केलेली आहे त्यानुसार माथेरानच्या स्वर्गवासी स्वातंत्रसेनानी श्री धोंडू लक्ष्मण पवार यांच्या विधवा श्रीमती सुशीला धोंडू पवार यांना ह्या योजनेचा लाभ मिळत होता पण मागील सहा महिन्यांपासून अचानक त्यांना ही पेन्शन मिळेनाशी झालेली आहे अनेक वेळा पत्र व्यवहार करून ही शासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नसल्याने माथेरानचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या समोर ही कैफियत मांडून सदर संदर्भात लेखी निवेदन देऊन लक्ष देण्याची मागणी केली आहे
श्रीमती सुशीला धोंडू पवार यांचे वय 74 वर्षे असून त्यांना एका दुर्धर आजाराने ग्रासलं आहे त्यातच त्यांच्या मुलाचे कोरोनामध्ये निधन झाले असून माथेरान मध्ये लागलेल्या लॉक डाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने त्यांची पेंशन त्वरित सुरू करावी अशी मागणी होत आहे