Kia कडून एमपीव्ही लाँच करण्याची तयारी
ज्ञान-तंत्रज्ञान
अनुप ढम
किया मोटर्सने (Kia Motors) कमी काळात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांत 4 लाख कार विकल्या आहेत. याचा फटका मारुतीच्या ब्रेझाला जास्त बसला आहे. आता किया अर्टिगाला टक्कर देण्य़ासाठी सज्ज होत असून 7 सीटर एमपीव्ही आणण्याच्या तयारीला लागली आहे.
Kia Sonet, Kia Seltos आणि Kia carnival या तीन कार सध्या कियाच्या ताफ्यात आहेत. यापैकी किया सेल्टॉसने तुफान सेल केला आहे. यामुळे पुढील वर्षी सुरुवातीला किया Kia KY ही एमपीव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. या कारची किंमत ही Maruti Ertiga आणि Toyota Innova Crysta सारख्या कारच्या रेंजमध्ये असू शकते. याची किंमत 14 ते 20 लाख रुपये असू शकते. या कारचे फिचर्स कसे असतील यावर किंमतीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. Kia KY 7 Seater MPV ही कार किया सेल्टॉस म्हणजेच ह्युंदाई क्रेटाच्या प्लॅटफॉर्मवर बनविली जाईल. या कारमधील थर्ड रो हा इलेक्ट्रॉनिक बटनाद्वारे अॅडजस्ट होईल. या एमपीव्हीमध्ये सहा आणि सात सीटर ऑप्शन असेल. कियाच्या या एसयुव्हीमध्ये ह्युंदाईच्या Hyundai Stargazer 7 Seater MPV सारखे फिचर असतील. ह्युंदाईची ही कार पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होणार आहे.