एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा
महाड पुरग्रस्तांसाठी संसारोपयोगी साहित्य आणि आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्र मिरर टीम-पुणे
आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे प्रभाग क्रमांक 32 चेअध्यक्ष कृष्णा रघुनाथ भंडलकर तसेच डोनेट एड सोसायटी च्या सारिका कृष्णा भंडलकर यांनी महाड येथील भावे वाडी रामवाडी लक्ष्मी वाडी या ठिकाणच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून घरगुती भांड्यांचा संच, ब्लॅंकेट, चादर,चटई, घरगुती किराणामाल यांचे कीट वाटप करण्यात आले. तसेच पूरग्रस्तांसाठी मेडिकल चेकअप कॅम्प घेण्यात आला. व सर्वांना मोफत मेडिसीनचे वाटप करण्यात आले.सुमारे 185 लोकांचे चेक अप या वेलीकरण्यात आले. यावेळी स्वयंसेवक अमर देशपांडे,क्षितिज फडकर, अथर्व देशपांडे, इंद्रजीत घोरपडे, सोनल पडवळकर, अक्षय धोंडे ,तसेच श्री बाला शुक्ला आणि डॉक्टर सतीश कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.