Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मधमाशी पालनातून मधक्रांती घडेल- सौ.वेदांतिकाराजे भोसले

 मधमाशी पालनातून मधक्रांती घडेल-सौ .वेदांतिकाराजे भोसले

१९ लाभार्थ्यांना सातेरी पेटी व इतर साहित्यांचे वाटप 

@ प्रतीक मिसाळ-सातारा


 दुष्काळ , अतिवृष्टी आणि बदलत्या निसर्गचक्रामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे . शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाकडे वळले पाहिजे . मधचा व्यवसाय करून मध , मेण , रॉयल जेली आदीमुळे आर्थिक उन्नती साधता येईल . त्यामुळे शेतकऱ्यांनी मधमाशी पालनातून मध्क्रांती घडवून आर्थिक सक्षम व्हावे , असे आवाहन वाघेश्वरी शेतकरी सहकारी कंपनीच्या अध्यक्षा श्रीमंत छ . सौ . वेदांतिकाराजे भोसले यांनी केले . महाराष्ट्र शासनाच्या उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णया नुसार मध संचालनालय , महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वाघेश्वरी शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या वतीने सातारा तालुक्यातील कास , सोनगाव , शेंद्रे , शेळकेवाडी , सातारा , बामणोली परिसर , लावंघर , करंडी , पिलाणी , कोडोली , जकातवाडी , किरोली , पुसेगाव तसेच महाबळेश्वर या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शेंद्रे येथे १० दिवसाचे मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात आले होते . अजिंक्यतारा साखर कारखाना सातारा येथे मधकेंद्र योजने अंतर्गत १ ९ लाभार्थीना १ ९ ० सातेरी मधपेटया , मधयंज १५ , मध साठविनेसाठी २६ भांडी , लोखंडी स्टॅण्ड १८० , बी व्हेल १ ९ , स्वार्म नेट १ ९ या साहित्याचे वाटप सौ . वेदांतिकाराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . याप्रसंगी त्या बोलत होत्या . यावेळी मध संचालनालय महाबेश्वर येथील संचालक दिग्विजय पाटील , कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत , कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते , संचालक सयाजीराव तारे पाटील , अशोकराव पाटील , मध पर्यवेक्षक असोलकर , दिलीप साळुखे , शिरसाट , बल्लाळ , वाघेश्वरी शेतकरी सहकारी कंपनीचे संतोष कदम व शेतकरी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते . प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 

शेती पूरक व जोडधंदा रूपाने रोजगार निर्मितीसाठी मध व्यवसायाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे . मध योजना शेतकऱ्यासाठी फायदेशीर असून परागीकरणामुळे पीकांच्या उत्पन्नात ४० ते ५० टक्के वाढ होत असल्याचे मत दिग्विजय पाटील यांनी व्यक्त करून याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले . जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies