कर्जत शहरातील वाहतुक कोंडीचा होणार पूर्णविराम .. लवकरच साकारणार बायपास ब्रीज
ज्ञानेश्वर बागडे-महाराष्ट्र मिरर टीम
शहापुर मुरबाड कर्जत हालमार्गे खोपोली असा राष्ट्रीय महामार्ग 548 अ कर्जत शहरातून जातो त्यामुळे मोठे मालवाहू ट्रक शहरातून जातात गावात छोटे ब्रीज आहेत ते फार जुने आहेत त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होते त्यामुळे नितीन गडकरी यांना सुनील गोगटे यांनी निवेदन देऊन कर्जत बायपास करावा अशी मागणी केली. सुनील गोगटे यांच्या मागणीला उत्तम प्रतिसाद देत लवकरच काम करू असे आश्वासन देण्यात आलं.यावेळी कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत आणि अक्षय सर्वगोड देखील उपस्थित होते.