उद्यापासून वाजवा "तिसरी घंटा" सरकारला साकडं!
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रंगकर्मींकडून महाआरतीचे आयोजन
अभिनेता विजय पाटकर, विजय गोखले, प्रदीप पटवर्धन, मेघा घाडगे, विजय राणे, संचित यादव, प्रमोद मोहिते, संचित यादव, हरी पाटणकर, गोट्या सावंत, शीतल करदेकर यांची उपस्थिती
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण मनोरंजनसृष्टी प्रभावित झाली आहे. या पार्श्वभूमीवर रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने सरकारला निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर १ सप्टेंबरला चित्रपट आणि नाट्यगृहे खुली करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. अजूनही त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसली तरी, योग्य ती पावले लवकरात लवकर उचलावीत यासाठी आज सर्व रंगकर्मीनी शिवाजी मंदिर नाट्यगृहाबाहेर महाआरतीचे आयोजन केले होते.
सरकारकडून मिळालेल्या आश्वासनावर रंगकर्मींचा विश्वास असून सरकारने ते आश्वासन पाळून १ सप्टेंबरलाच नाट्यगृहे उघडावीत यासाठी आजच्या आरतीचे प्रयोजन करण्यात आले होते. रंगकर्मी आपल्या मागण्यांबाबत ठाम असल्याचे यावेळी नमूद करत सरकारने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती रंगकर्मीनी यावेळी केली. या महाआरतीला अभिनेता विजय पाटकर, विजय गोखले, प्रदीप पटवर्धन, मेघा घाडगे, विजय राणे, संचित यादव, प्रमोद मोहिते, संचित यादव, हरी पाटणकर, गोट्या सावंत, शीतल करदेकर आदि रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.